Egg or Milk : अंडे की दूध ? काय आहे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर

| Updated on: Mar 13, 2024 | 8:51 PM

अनेकांना दररोज दूध पिण्याची सवय असते. तर अनेक जण जीम करताना दररोज अंड्याचे सेवन करतात. पण अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की, दूध आणि अंडी यामध्ये अधिक फायद्याचे शरीरासाठी काय असते. एका अहवालात याचा खुलासा करण्यात आला आहे. जाणून घेऊयात.

Egg or Milk : अंडे की दूध ? काय आहे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर
Follow us on

Egg or Milk : अंडी किंवा दूध दोन्ही गोष्टींचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. पण एक प्रश्न जो नेहमीच चर्चेत येतो आहे. ते म्हणजे अंडी की दूध दोघांपैकी कोणते अधिक फायद्याचे असते. या दोन्ही गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. अंडी आणि दूध हे दोघांमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. ज्या लोकांना स्नायूंची वाढ सुधारायची आहे त्यांनी अंडी आणि दूध यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या दोन्ही गोष्टींमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. पण अधिक फायद्याचे काय आहे जाणून घेऊयात.

एका अंड्यापासून काय मिळते

हेल्थलाइनच्या अहवालानुसार, एका उकडलेल्या अंड्यामध्ये (1 Egg ) सुमारे 6.3 ग्रॅम प्रथिने, 77 कॅलरीज, 5.3 ग्रॅम एकूण चरबी, 212 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल, 0.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 25 मिलीग्राम कॅल्शियम यासह व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन असते. या शिवाय B5, फॉस्फरस, सेलेनियमसह अनेक पोषक घटक असतात. विशेष म्हणजे यात कोलेस्टेरॉलचे (cholesterol) प्रमाण जास्त असते, पण त्याचा रक्तातील कोलेस्टेरॉलवर कमी परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत नाही. ज्या लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी अंडी खाण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा.

एक कप दुधापासून काय मिळते

एका कप दूध म्हणजेच 250 ग्रॅम दूधमध्ये. 8.14 ग्रॅम उच्च दर्जाची प्रथिने, 152 कॅलरीज, 12 ग्रॅम कार्ब, 12 ग्रॅम साखर, 8 ग्रॅम फॅट, 250 मिलीग्राम कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, रिबोफ्लेविन, फॉस्फरस आणि इतर अनेक पोषक घटक असतात. दुधात ८८ टक्के पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. दुधात काही प्रमाणात व्हे प्रोटीन देखील आढळते. प्रथिनांसह दूध कॅल्शियमचा ( calcium) उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. विशेष म्हणजे दुधापासून मिळणारे कॅल्शियम शरीरात सहज शोषले जाते.

दोघांपैकी कोणते अधिक फायदेशीर

आता जर आपण दूध आणि अंडी यांची तुलना केली तर दोन्ही गोष्टींमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात. पण दुधात अंड्यांपेक्षा जास्त कॅल्शियम असते. अंड्यांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल असते, पण ते दुधात नसते. दोन्ही गोष्टींमध्ये कॅलरीजचे प्रमाण फार जास्त नसते आणि ते सेवन करणे सुरक्षित मानले जाते. पण जर तुम्ही शाकाहारी असाल तर दुधाचे मोठ्या प्रमाणावर सेवन करा. पण जर तुम्ही अंडी खात असाल तर तुम्ही आठवड्यातून 4 ते 5 अंडी खाऊ शकता.

दुसरीकडे तुम्ही दररोज दूध पिऊ शकता. कारण दररोज दूध पिल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.