दारुने होणारे नुकसान कमी करतो व्यायाम?, संशोधनात उघड झाले धक्कादायक सत्य

नियमित एक्सरसाईजने तुमच्या शरीरात आमुलाग्र बदल होत असतो. दारु प्यायल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळते. यावर एका संशोधनात धक्कादायक निष्कर्ष उघडकीस आले आहेत.

दारुने होणारे नुकसान कमी करतो व्यायाम?, संशोधनात उघड झाले धक्कादायक सत्य
file photos
| Updated on: Mar 15, 2026 | 10:49 PM

हृदय विकाराचे झटके, बॅड कोलेस्ट्रॉल आणि फॅटी लिव्हरची समस्या आजकाल खूप वेगाने वाढत आहे. तरुणांना देखील या समस्या भेडसावत आहेत. मद्यपानामुळे यातील अनेक आजार वाढत असतात. त्यामुळे डॉक्टर नेहमी मद्यपान कमी करण्याचा सल्ला देत असतात. आता एका नव्या संशोधनात एक आश्चर्यकारक गोष्ट उघडकीस आली आहे.

नव्या संशोधनानुसार जे लोग दारु पिण्यासोबतच रोज व्यायामही करतात, त्यांना काही गंभीर आजारात मृत्यूचा धोका कमी असतो असे उघडकीस आले आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही तुम्ही कोणताही विचार न करता मद्याच्या आहारी जावे. हे संशोधन रिसर्च ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झाले आहे. संशोधनाचा हेतू हा होता की फिजिकल एक्टीव्हीटी दारुने होणारी नुकसान खास करुन कॅन्सर आणि हृदयाच्या आजाराने होणारे मृत्यू कमी करु शकते का ?

36 हजाराहून अधिक लोकांवर संशोधन

या अभ्यासात ब्रिटन आणि स्कॉटलँडचे ३६ हजार ३७० पुरुष आमि महिलांच्या आकड्यांचा अभ्यास केला. ही माहिती अनेक वर्षे केलेल्या सर्वेतून मिळवली गेली. सर्वेत कॅन्सर आणि हार्ट डिसिज सारख्या आजाराने होणाऱ्या मृत्यूंवर लक्ष ठेवण्यात आले.

संशोधनात सर्व लोकांना त्यांच्या दारु पिण्याच्या सवयीनुसार विविध कॅटगरीत विभागले गेले.

१ – जे लोक कधीच दारु पित नाहीत

२ – जे लोक आधी दारु प्यायचे आता पित नाहीत.

३ – जे लोक अधी-मधी दारु पितात

४ – जे मर्यादित दारु पितात

५ – जोखीमपूर्ण स्तरावर दारु पिणारे

६ – खूप जास्त दारु पिणारे

फिजिकली एक्टीव्हीटी आधारे देखील वर्गवारी झाली

दारु पिणाऱ्यांशिवाय फिजिकली एक्टीव्हीटी करणाऱ्यांची देखील वर्गवारी केली

१ – अजिबात व्यायाम न करणारे

२ – मध्य स्वरुपाचा व्यायाम करणारे

३ – जास्त व्यायाम करणारे लोक

अभ्यासात काय आढळले ?

जास्त दारु पिणाऱ्यात कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित आजाराचा धोका सुमारे ४० टक्क्यांपर्यंत जास्त होता. एवढेच काय जे लोक मर्यादित दारु प्यायचे परंतू व्यायाम करायचे नाहीत त्यांच्यात जोखीम जास्त आढळली. मात्र, जे लोक दारु पिण्यासोबत व्यायाम देखील करत होते त्यांच्या हा धोका अपेक्षेपेक्षा कमी आढळला. म्हणजे व्यायाम काही प्रमाणात दारुने होणारे नुकसान कमी करु शकतो.

दारुचा काय परिणाम होतो ?

तज्ज्ञानुसार दारु डायजेशन प्रोसेसवर खूप परिणाम करते.यामुळे शरीरात ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. काळांतराने सूज देखील येत. शरीराच्या फॅट मेटाबॉलिझ्मवर देखील परिणाम होतो. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढू शकते. त्यामुळेच जास्त दारु प्यायल्याने हायब्लड प्रेशर, हृदयाचा आजार आणि कॅन्सरचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार १८ ते ६४ वर्षांच्या लोकांनी दर आठवड्याला किमान १५० ते ३०० मिनिटे मध्यम स्वरुपाचा व्यायाम करायला हवा.एखादी व्यक्ती दारु पिते आणि व्यायाम करत असेल तर काही जोखीम कमी होऊ शकते. परंतू चांगला पर्याय दारुचे सेवन कमी करणे हाच आहे. आणि व्यायामाला रोजचा नित्यक्रम बनवावे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us