Health | एज्युकेशन लोन घेतलं अन् नाही फेडलं तर चाळीशीला ह्रदयविकाराचा धोका, संशोधनातून आलं धक्कादायक सत्य समोर!

| Updated on: May 10, 2022 | 3:12 PM

नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की, जे लोक एज्युकेशन लोन घेऊनही चाळीशीपर्यंत हे फेडत नाहीत. त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका अधिक असतो. अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन जर्नलमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

Health | एज्युकेशन लोन घेतलं अन् नाही फेडलं तर चाळीशीला ह्रदयविकाराचा धोका, संशोधनातून आलं धक्कादायक सत्य समोर!
Image Credit source: ghru.edu.in
Follow us on

मुंबई : उच्च शिक्षणासाठी (Higher education) जवळपास सर्वजण एज्युकेशन लोन घेतात. या एज्युकेशन लोनमुळे विद्यार्थ्यांना आपले शिक्षण आणि स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधीच मिळते. विशेष म्हणजे एज्युकेशन लोन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्त प्रयत्न करण्याची गरज लागत नाही आणि त्यांना एज्युकेशन लोन (Education loan) सहज मिळते. एज्युकेशन लोनवर बॅंक खूप कमी इंटरेस्ट घेते आणि जेंव्हा तो विद्यार्थी पैसे कमवण्यास सुरूवात करतो, त्यावेळी त्याला ते पैसे फेडावे लागतात. मात्र, असे बरेच विद्यार्थी आहेत. जे शिक्षण सुरू असताना एज्युकेशन लोन घेतात, त्यानंतर बक्कळ पैसे (Money) कमवतात, पण जेंव्हा एज्युकेशन लोन फेडायची वेळ येते तेंव्हा मात्र अनेक पळवाटा शोधून एज्युकेशन लोन फेडत नाहीत. मात्र, एज्युकेशन लोन न फेडणाऱ्यांसंदर्भात एका संशोधनातून धक्कादायक सत्य समोर आले आहे.

एज्युकेशन लोन न फेडणाऱ्यांनो सावधान…

नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की, जे लोक एज्युकेशन लोन घेऊनही चाळीशीपर्यंत हे फेडत नाहीत. त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका अधिक असतो. अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन जर्नलमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. संशोधनानुसार ज्यालोकांनी एज्युकेशन लोन घेतले आहे आणि ते वेळेमध्येच पूर्ण फेडले आहे. त्यांचे आरोग्य नेहमीच चांगले राहते. मात्र, या उलट जे लोक एज्युकेशन लोन घेतात पण ते फेडत नाहीत, त्यांना ह्रदयविकारा धोका अधिक प्रमाणात असतो.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका अधिक

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सध्या महागाई खूप वाढली आहे. यामुळे घराचे आर्थिक गणित हे सातत्याने बिघडत चालले आहे. त्यामध्येही एकाच कुटुंबामध्ये शिक्षण घेणारे दोन व्यक्ती असतील तर शैक्षणिक खर्च करणे अवघड झाले आहे. यामुळे विद्यार्थी एज्युकेशन लोन घेऊन आपले शिक्षण पुढे सुरू ठेवतात. एज्युकेशन लोनमुळे बऱ्यापैकी आर्थिक भार कुटुंबाचा कमी होतो. यामुळेच एज्युकेशन लोन घेण्यावर विद्यार्थ्यांना अधिक भर असतो. मात्र, नोकरी लागल्यानंतर बरेच लोक एज्युकेशन लोन फेडण्यासाठी टाळाटाळ करतात. पण जेंव्हा माणसाच्या डोक्यावर कर्जाचे टेन्शन असते, त्यावेळी त्याला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. यासंदर्भात aninews ने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.