फळे आरोग्यासाठी चांगलीच! कोणती फळे रिकाम्या पोटी खाणे उत्तम? वाचा

त्यांचे सेवन केल्याने शरीरातील अनेक प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात. फळे तुमची पचनसंस्था देखील मजबूत करतात, तर काही फळे अशी असतात ज्यांचे सेवन तुम्ही रिकाम्या पोटी केल्याने तुम्ही नेहमी निरोगी राहता.

फळे आरोग्यासाठी चांगलीच! कोणती फळे रिकाम्या पोटी खाणे उत्तम? वाचा
eat fruits
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 02, 2023 | 4:11 PM

मुंबई: फळे खाणे ही बहुतांश लोकांची पसंती असते. ते हलके असतात आणि शरीरासाठी खूप फायदेशीर देखील असतात. त्याचबरोबर त्यांचे सेवन केल्याने शरीरातील अनेक प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात. फळे तुमची पचनसंस्था देखील मजबूत करतात, तर काही फळे अशी असतात ज्यांचे सेवन तुम्ही रिकाम्या पोटी केल्याने तुम्ही नेहमी निरोगी राहता.

सकाळी रिकाम्या पोटी खा ही फळे

पपई

पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात सोडियम, फायबर, प्रथिने, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते. अशात जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करा. याचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलही नियंत्रणात राहते.

टरबूज

बहुतेक लोकांना टरबूज खायला आवडतं. यात कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे हे शरीराला दीर्घकाळ हायड्रेटेड ठेवते. सकाळी रिकाम्या पोटी ते सहज खाल्ले जाऊ शकते.

सफरचंद

शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यात फायबर, लोह आणि व्हिटॅमिन सी असते जे आपल्या शरीरातून अशक्तपणा दूर करण्याचे काम करतात.

किवी

किवी चवीला आंबट-गोड असते, त्यामुळे बहुतेकांना ते खायला आवडतं. अशावेळी रिकाम्या पोटी किवी खाल्ल्यास तुमचे वजनही कमी होते आणि तुमचे शरीर तंदुरुस्त राहते. याशिवाय हार्ट स्ट्रोकचा धोकाही कमी करू शकता.

सफरचंद

सफरचंदाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण सफरचंदात अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे वजन कमी करायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर रोज सफरचंदांचं सेवन करायला हवं.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)