Krishna Khopde : तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन, प्रकरण नेमकं काय?
भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांना तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांकडून धमकी आल्याचा आरोप आहे. खोपडे यांनी मराठवाड्यातून धमकीचे फोन आल्याचे म्हटले असून, याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, तुकाराम मुंढे कुठेतरी अडचणीत येणार असल्याने त्यांचे समर्थक धमकी देत आहेत
भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांना तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांकडून धमकी आल्याचा आरोप समोर आला आहे. खोपडे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना मराठवाड्यातून धमकीचे फोन आले आहेत. “तुम्ही त्याच्या विरुद्ध का बोलता, त्याला का हे करता?” अशा प्रकारे धमक्या मिळाल्याचे खोपडे यांनी सांगितले. ते या संदर्भात पोलीस तक्रार दाखल करणार आहेत. धमकी देणाऱ्यांच्या कृतीवरून तुकाराम मुंढे कुठेतरी अडचणीत येणार आहेत किंवा फसणार आहेत, त्यामुळे त्यांचे समर्थक घाबरून धमकी देत असल्याचा दावा खोपडे यांनी केला आहे.
तर दुसरीकडे महेंद्र थोरवे यांनी भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री करावे अशी जोरदार मागणी केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून रायगड पालकमंत्री पदासाठी हा दावा करण्यात आला आहे. थोरवे यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य करताना म्हटले आहे की, “आम्ही बंड केले म्हणूनच सत्ता आली, पण भाजपला याची जाणीव राहिली नाही.” शिवसैनिकांनी, विशेषतः तिन्ही आमदारांनी केलेल्या उठावामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सरकार राज्यात आले, परंतु त्याची जाणीव आता राहिलेली नाही, असे त्यांना वाटत आहे. भरत गोगावले हे ज्येष्ठ आमदार असून आता मंत्री झालेले आहेत, त्यामुळे त्यांनाच रायगडचे पालकमंत्री करावे ही त्यांची ठाम भूमिका आहे. वरिष्ठांकडून सध्या ज्या प्रकारचे राजकारण सुरू आहे, त्यामुळे आपण पूर्णपणे नाराज असल्याचे थोरवे यांनी स्पष्ट केले.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'

