Health | मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहायचे असेल तर सकाळी लवकर उठणे आवश्यकच, वाचा अधिक!

| Updated on: Jun 19, 2022 | 9:45 AM

कुठल्याही गोष्टीचे अगोदरच नियोजन करून ठेवणे फायदेशीर ठरते. आपण दिवसभराचे नियोजन नक्कीच करायला हवे. सकाळी लवकर उठल्यावर घाईगडबडीत काम करण्याऐवजी आपण प्रत्येक कामाला व्यवस्थित वेळ देऊ शकतो. यामुळे आपले कामही फास्ट होते. असे केल्याने आपल्याला मानसिकदृष्ट्या चांगले वाटते. बरेच लोक अगोदरच संपूर्ण दिवसाचे नियोजन करतात.

Health | मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहायचे असेल तर सकाळी लवकर उठणे आवश्यकच, वाचा अधिक!
Image Credit source: orissapost.com
Follow us on

मुंबई : आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकले असेल की, सकाळी लवकर उठणे आपल्या आरोग्यासाठी (Health) फायदेशीर असते. सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. सकाळी लवकर उठल्याने आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहतो. शरीर आणि मन ताजेतवाने राहते, याशिवाय अनेक फायदेही मिळतात. मात्र, सध्याच्या खराब जीवनशैलीमध्ये (Lifestyle) आपण सर्वच उलटे करतो. रात्री उशीरापर्यंत मोबाईल आणि लॅपटाॅपवर टाईमपास करत बसतो. मग काय सकाळी लवकर जाग येत नाही. परिणामी मग धावपळीत नास्ता वगैरे न करताच आपण आॅफिसला निघतो. सकाळी उठून व्यायाम करणे तर दूरचीच गोष्ट आहे. घरी नाश्ता करायला वेळ मिळत नसल्याने बाहेर खाद्यपदार्थांचे सेवन केले जाते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. जर खरोखरच आपल्याला निरोगी जीवन (Healthy life) जगायचे असेल तर आपण काही महत्वाच्या टिप्स फाॅलो करणे अत्यंत आवश्यक आहे.

नियोजन करा

कुठल्याही गोष्टीचे अगोदरच नियोजन करून ठेवणे फायदेशीर ठरते. आपण दिवसभराचे नियोजन नक्कीच करायला हवे. सकाळी लवकर उठल्यावर घाईगडबडीत काम करण्याऐवजी आपण प्रत्येक कामाला व्यवस्थित वेळ देऊ शकतो. यामुळे आपले कामही फास्ट होते. असे केल्याने आपल्याला मानसिकदृष्ट्या चांगले वाटते. बरेच लोक अगोदरच संपूर्ण दिवसाचे नियोजन करतात. मात्र, ते फाॅलो अजिबात करत नाहीत. असे न करता व्यवस्थित नियोजन करून आपण ते फाॅलो करणेही तितकेच आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

सकारात्मक

सकाळी लवकर उठून आपण खूप सकारात्मक राहतो. कारण आपण सर्व काही वेळेवर आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो. ऑफिसमध्ये काम करताना देखील चांगले वाढते. यामुळेच सकाळी लवकर उठणे आवश्यक आहे. जर सकाळी उशीरा उठलो की, आपले एकही काम वेळेवर आणि व्यवस्थित पूर्ण होत नाही. परिणामी दिवसभर आपली चिडचिड वाटते. यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की, आपला दिवस चांगला आणि निरोगी जावा तर सकाळी लवकर उठा.

सकस आहार

आपल्या निरोगी शरीरासाठी सकस आहारा हा अत्यंत महत्वाचा आहे. जर आपण सकाळी लवकर उठलो नाहीतर आपल्याला जेवण तयार करण्यासाठी वेळ मिळत नाही. परिणामी आपण दिवसभर बाहेरल खाद्यपदार्थ खातो. यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होते. शिवाय आपले वजन झपाट्याने वाढण्यासही सुरूवात होते. सकाळी लवकर उठून जेवण तयारकरण्यासाठी आपल्याला वेळ मिळेल. आपण स्वतःसाठी निरोगी नाश्ता बनवू शकतो. यामुळे तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहता. यामुळे तुम्ही दिवसभर चांगले काम करू शकतात.

व्यायाम

उशीरा उठण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे उशीरा उठल्यानंतर दररोजची कामे करण्यासाठीच आपल्याला वेळ मिळत नाही. मग व्यायाम करणे तर दूरचीच गोष्ट आहे. सकाळी लवकर उठल्याने आपण व्यायामासाठी वेळ काढू शकतो. नियमित व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. अनेक गंभीर आजारांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. यामुळे रात्री लवकर झोप आणि सकाळी लवकर उठा. व्यायाम केल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात.