Agneepath Scheme Protest | एका रेल्वेला आग लागल्यास तब्बल इतक्या कोटींचे होते नुकसान, तरूणांनो हे वाचाच!

रेल्वेची मालमत्ता ही देशाची संपत्ती आहे. त्यात देशाचा पैसा खर्च होतो, देशातील नागरिकांचा पैसा खर्च होतो. तरुण रेल्वेला आग लावून किंवा स्थानकांची तोडफोड करून स्वतःचे आणि देशाचे नुकसान करत आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, फक्त पूर्व मध्य रेल्वेच्या अंतर्गत रेल्वेचे 60 हून अधिक डबे आणि 10 हून अधिक इंजिनांना आग लावण्यात आलीये.

Agneepath Scheme Protest | एका रेल्वेला आग लागल्यास तब्बल इतक्या कोटींचे होते नुकसान, तरूणांनो हे वाचाच!
Image Credit source: conomictimes
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 9:50 AM

मुंबई : केंद्र सरकारने लष्करात शॉर्ट कमिशनसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath scheme) देशभरात कडाक्याचा विरोध होत आहे. विशेष: उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तरूण रस्त्यावर उतरून सरकारी मालमत्तेचे नुकसान करताना दिसत आहेत. योजनेला विरोध करत बिहारमधील तरूणांनी तर चक्क रेल्वे गाड्यांना आग लावलीये. याचबरोबर आरामध्येही गोंधळाचे वातावरण आहे. आंदोलकांकडून (Agitator) अनेक ठिकाणी चक्काजाम करण्यात येत आहे. तरूण सगळीकडे जाळपोळ करत आहेत. आंदोलकांनी बिहारमध्ये सर्वाधिक अशांतता निर्माण केलीये. या योजनेविरोधात तरुणांचा रोष इतका वाढला आहे की, आतापर्यंत अनेक रेल्वे गाड्या जाळण्यात आल्या आहेत. शुक्रवारी, बिहारच्या (Bihar) लखीसरायमध्ये, तरुणांनी मोहिउद्दीन नगरमध्ये विक्रमशीला एक्स्प्रेस पूर्णपणे जाळली आहे.

रेल्वेची मालमत्ता ही देशाची संपत्ती

रेल्वेची मालमत्ता ही देशाची संपत्ती आहे. त्यात देशाचा पैसा खर्च होतो, देशातील नागरिकांचा पैसा खर्च होतो. तरुण रेल्वेला आग लावून किंवा स्थानकांची तोडफोड करून स्वतःचे आणि देशाचे नुकसान करत आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, फक्त पूर्व मध्य रेल्वेच्या अंतर्गत रेल्वेचे 60 हून अधिक डबे आणि 10 हून अधिक इंजिनांना आग लावण्यात आलीये. यामध्ये रेल्वेचे कोट्यावधीचे नुकसान झाले. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वेच्या मालमत्तेची तोडफोड आणि जाळपोळ यामुळे एकट्या बिहारमध्ये 200 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तुम्हाला हे जाणून नक्कीच आर्श्चय वाटले की, एक रेल्वे तयार करण्यासाठी किती मोठा पैसा खर्च होतो आणि हा पैसा संपूर्ण देशाच्या असतो. यामुळेच तरूणांनी रेल्वेची किंवा रेल्वे स्टेशनची जाळपोळ करण्याच्या अगोदर हे नक्कीच वाचावे.

हे सुद्धा वाचा

वाचा फक्त एक कोच तयार करण्यासाठी किती पैसे लागतात

मालदा रेल्वे विभागात कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी श्रेष्ठा गुप्ता सांगतात की, विक्रमशिला एक्स्प्रेसमध्ये 2017 साली पहिल्यांदा LHB कोच बसवण्यात आला होता. सध्या विक्रमशिला एक्स्प्रेस, LHB कोचसह चालवली जाते. विक्रमशिला एक्सप्रेसमध्ये एकूण 22 डबे आहेत. रेल्वेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका एलएचबी कोचच्या उत्पादनाची अंदाजे किंमत अडीच कोटी रुपये आहे. त्याचवेळी, एलएचबी कोचच्या एका रेकवर सुमारे 40 कोटी रुपये खर्च केले जातात. सुमारे 15 कोटींच्या इंजिनसह. त्याची किंमत 55 कोटी रुपये होते. हा अंदाज वर्षभरापूर्वीचा असला तरी अलीकडच्या काळात हा खर्च वाढला असावा, असेही त्यांनी बोलताना सांगितले.

एका रेल्वेला आग लावल्यास तब्बल 110 कोटींचे नुकसान

2.5 कोटी रुपयांच्या आधारे 23 डब्यांच्या ट्रेनची किंमत 57.5 कोटी, इंजिनची किंमत जोडल्यास एकूण खर्च 72.50 कोटी रुपये येतो. यानंतर ते पूर्ण करण्याचा खर्च येतो. स्लीपर कोचच्या तुलनेत थर्ड एसीची किंमत जास्त आहे. तसेच बोगी जितकी अपग्रेड केली जाईल तितका खर्च वाढेल, अशा परिस्थितीत विक्रमशिला रेकला आग लागून 110 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आंदोलक तरुणांनी सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान केले आहे. मालदाह नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले ऑपरेशनल ऑपरेटर श्रेष्ठ सांगतात की, रेल्वेला सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळेच तरूणांनी रेल्वेला आग लावण्याच्या अगोदर 100 वेळा नक्कीच विचार करायला हवा.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.