Bird Flu Prevention Guidelines | बर्ड फ्लू रोखण्यासाठी पशूसंवर्धन विभागाकडून मार्गदर्शक सूचना, चिकन खरेदी करताना घ्या ही काळजी!

| Updated on: Jan 11, 2021 | 1:26 PM

राज्यातील 5 जिल्ह्यात बर्ड फ्लूनं संक्रमित पक्षी आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर पशूसंवर्धन विभागानं पोल्ट्रीचालकांसाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

Bird Flu Prevention Guidelines | बर्ड फ्लू रोखण्यासाठी पशूसंवर्धन विभागाकडून मार्गदर्शक सूचना, चिकन खरेदी करताना घ्या ही काळजी!
Follow us on

मुंबई: कोरोनानंतर आता देशात बर्ड फ्लूचं (bird flu) संकट आलेलं पाहायला मिळतं आहे. आतापर्यंत राज्यातील 5 जिल्ह्यात बर्ड फ्लूनं संक्रमित पक्षी आढळले आहेत. यात सर्वात आधी नंबर लागला आहे तो परभणी (bird flu in Parbhani) जिल्ह्याचा. परभणी जिल्ह्यात 1 हजार कोंबड्यांची मरतूक झाली होती. त्यानंतर तिथं तपासणी कऱण्यात आली. या तपासणीत 1 कोंबडी बर्ड फ्लूनं संक्रमित असल्याचं आढळलं. शिवाय मुंबईत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू आढळला आहे तर ठाण्यात बगळे आणि कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू सापडले आहेत. दापोलीतही कावळ्यामध्ये बर्ड फ्लूचा विषाणू सापडल्याची माहिती आहेत. याच पार्श्वभूमीवर पशूसंवर्धन विभागानं त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पोल्ट्री चालकांसाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. (Guidelines from the Department of Animal Husbandry for the prevention of bird flu)

बर्ड फ्ल्यूच्या प्रतिबंधासाठी कर्मचाऱ्यांना पशूसंवर्धन विभागाकड़ून मार्गदर्शक सूचना

  • 01. अचानक मोठ्या प्रमाणावर पक्षी मृत होताना आढळल्याची त्याची त्वरित माहिती पशूसंवर्धन कार्यालयाला द्यावी
  • 02. शेतकरी आणि पशूपालकांना बर्ड फ्लूबाबत सविस्तर माहिती द्यावी.
  • 03. पशूवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रोजच्या किंवा आठवडी बाजारात विशेष सर्व्हेक्षण मोहिम राबवावी
  • 04. बर्ड फ्लू संशयीत क्षेत्रातून पक्षांची ने-आण पूर्णपणे बंद करावी
  • 05. उघड्या कत्तलखान्यांवर लक्ष्य ठेवावी आणि तिथे रोजच्या रोज निर्जंतुकीकरण करावे
  • 06. बर्ड फ्लूचे जंतू डुकरांमध्ये किंवा डुकरांमधून इतरत्र संक्रमित होणार नाही याची काळजी घ्यावी
  • 07. जिल्हास्तरावर बर्ड फ्लू नियंत्रणासाठी लागणारे पीपीई कीट, मास्क, निर्जंतुकांसह इतर साहित्य उपलब्ध करुन ठेवावे
  • 08. प्रत्येक पोल्ट्रीफार्मला भेटी देऊन तिथंली तपासणी करणं गरजेचं आहे.
  • 09. प्रत्येक ग्रामपंचायतीनं धुण्याचा सोडा (Na2Co2 सोडियम कार्बोनेट) यांचं 1 लीटर पाण्यात 7 ग्रॅम मिश्रण करावं. आणि हे मिश्रण कोंबड्यांचं खुराडं, गुरांचे गोठे, गावातील गटारे, नाल्या वा पशूपक्षांचा जास्त वावर असणाऱ्या ठिकाणी फवारावे. दर 15 दिवसात 3 वेळे हे फवारणे गरजेचे आहे.
  • 10. जिल्हास्तरावर दक्षता कक्षाची स्थापना करावी आणि त्यांना बर्ड फ्लूबाबत आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे

 

बर्ड फ्लूबाबत पोल्ट्रीचालकांना पशूसंवर्धन विभागाच्या सूचना

  • 01. पोल्ट्रीचालकांनी कोंबड्यांवर बारीक लक्ष्य ठेवावे, त्यांच्यात कुठल्याही रोगाची लक्षणं दिसत नाही ना याची सगळी माहिती ठेवावी.
  • 02. पोल्ट्रीफार्मवर जैवसुरक्षा कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. आणि कुठल्याही आजाराची लक्षणं दिसल्यास, वा पक्षांची मरतूक दिसल्यास त्यांची माहिती पशूसंवर्धन विभागाला द्यावी.
  • 03. पोल्ट्री स्वच्छ ठेवावी, पक्षांची सुरक्षित वाहतूक करावी. मृत पक्षांची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावावी. वेळच्या वेळी लसीकरण करावे.
  • 04. कुठल्याही पक्षात मरतूक आढल्यास, त्याचे पोल्ट्रीफार्मवर शवविच्छेदन करण्याचा प्रयत्न करु नये. जिल्हास्तरीय प्रयोगशाळेला याची सूचना द्यावी
  • 05. संशयीत वा प्रादुर्भावग्रस्त पोल्ट्री असल्यास, तिथून पक्षांची वाहतूक तातडीनं थांबवावी.

 

चिकन-अंडी खाताना ही काळजी घ्या

  • 01. चिकन किंवा अंडी चांगले शिजलेली असणं अत्यंत गरजेचं आहे. 70 ते 100 अंश सेल्सिअसवर चिकन शिजवल्याशिवाय खाऊ नका
  • 02. कच्चे मांस वा अंडी खाण्याची चूक करु नका, त्यामुळं तुम्हाला बर्ड फ्लूचं संक्रमण होऊ शकते
  • 03. अंडी वा चिकन खरेदी करताना तोंडाला मास्क असू द्या
  • 04. चिकन स्वच्छ करताना हॅण्डग्लव्ह्ज वापरल्यास अतिउत्तम
  • 05. हॉटेलमधील वा अन्य ठिकाणी चिकन वा अंडी खाणं शक्यतो टाळा

 

केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री म्हणतात…

केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, ‘कोंबडीची अंडी आणि मांस व्यवस्थित शिजवलेले असेल तर ते खाऊ शकता. त्यामुळे त्याचा संसर्ग होणार नाही. आतापर्यंत हा फ्लू मानवांमध्ये आढळलेला नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. सरकारने सर्व राज्यांना सूचनापत्र देखील जारी केले आहेत. भविष्याचा विचार करून नियंत्रण कक्ष देखील तयार केले गेले आहेत.’

संबंधित बातम्या:

Bird Flu | सावधान! महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या…

Bird Flu | बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!

 

(Guidelines from the Department of Animal Husbandry for the prevention of bird flu)