Side effects of Oranges : संत्री खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, पण दिवसभरात किती खायचे ते जाणून घ्या!

| Updated on: Nov 14, 2021 | 8:59 AM

हिवाळा आला आहे आणि या हंगामाबरोबर हंगामी फळे आणि भाज्या देखील मार्केटमध्ये येतात. आपल्या सर्वांना माहित आहे की हिवाळ्यात हिरव्या ताज्या पालेभाज्या आणि ताजी फळे खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. या हंगामात येणारे असेच एक खास फळ आहे ते म्हणजे संत्री.

Side effects of Oranges : संत्री खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, पण दिवसभरात किती खायचे ते जाणून घ्या!
संत्री
Follow us on

मुंबई : हिवाळा आला आहे आणि या हंगामाबरोबर हंगामी फळे आणि भाज्या देखील मार्केटमध्ये येतात. आपल्या सर्वांना माहित आहे की हिवाळ्यात हिरव्या ताज्या पालेभाज्या आणि ताजी फळे खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. या हंगामात येणारे असेच एक खास फळ आहे ते म्हणजे संत्री. हिवाळ्याच्या हंगामात संत्रीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.

जाणून घ्या संत्रीमधील पोषक घटक

संत्री हे फळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे फळ जेवढे चवीसाठी सर्वांचे आवडते आहे तेवढेच आरोग्याच्या दृष्टीनेही हे फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त संत्री आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास प्रभावी आहे. पण हे फळ जास्त खाल्ल्याने काही दुष्परिणाम होतात हे तुम्हाला माहीत आहे का?

100 ग्रॅम संत्र्यामध्ये 48 ग्रॅम कॅलरीज, 8 ग्रॅम पाणी, 0.9 ग्रॅम प्रथिने, 11.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 9.4 ग्रॅम साखर, 2.4 ग्रॅम फायबर आणि 6 टक्के व्हिटॅमिन सी असते. संत्री हे आरोग्यदायी फळ आहे यात शंका नाही. मात्र, हे फळ प्रमाणात खाणे आवश्यक आहे. जर एखाद्याने दररोज 4-5 संत्री खाण्यास सुरुवात केली तर जास्त प्रमाणात फायबर मिळेल. यामुळे पोटदुखी, अतिसार, गोळा येणे आणि मळमळ होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

या लोकांनी संत्री खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

व्हिटॅमिन सीच्या जास्त प्रमाणामुळे छातीत जळजळ, उलट्या, निद्रानाश आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. संत्री नैसर्गिकरीत्या आम्लयुक्त असतात. जे जास्त प्रमाणात घेतल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. याव्यतिरिक्त, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (GERD) असलेल्या लोकांना ही समस्या होण्याची शक्यता असते. गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग असलेल्या लोकांनी संत्री खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जास्त संत्री खाल्ल्याने उलट्या आणि छातीत जळजळ होऊ शकते. ज्या लोकांच्या रक्तात पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे त्यांनी संत्री खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक