Health | या 4 आरोग्यदायी पदार्थांमुळे होऊ शकतो कॅन्सर, वाचा संशोधनातून नेमके काय पुढे आले!

| Updated on: May 10, 2022 | 2:01 PM

दूध आणि दही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. दुधात असलेले कॅल्शियम आपल्याला हाडे तयार करण्यास मदत करते. हे स्नायू तयार करण्यास देखील मदत करते. अनेक दुग्धजन्य पदार्थ कॅन्सरचा धोका वाढवतात. यामुळे दूध, दही, पनीर, चीज वगैरे खाण्याच्या अगोदर नक्कीच विचार करा. कुठलाही पदार्थ प्रमाणात खाणे आरोग्यासाठी चांगले असते.

Health | या 4 आरोग्यदायी पदार्थांमुळे होऊ शकतो कॅन्सर, वाचा संशोधनातून नेमके काय पुढे आले!
Follow us on

मुंबई : सध्या जगभरामध्ये कॅन्सरच्या (Cancer) रूग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. दैनंदिन जीवनात काही खाद्यपदार्थ आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे कॅन्सरचा धोका अधिक वाढतो. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून (Survey) ही बाब समोर आली आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, दूध, मासे आणि दही आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. मात्र, अशाच काही निरोगी पदार्थांमुळे देखील कॅन्सरची लागण होते. सध्याच्या काळामध्ये अनेक खाद्यपदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्ह (Preservative) टाकले जाते. प्रिझर्वेटिव्ह हे आपल्या शरीरासाठी अत्यंत खतरनाक आणि धोकादायक असते. त्यात असलेले अतिरिक्त मीठ हे कॅन्सरचे मूळ आहे, म्हटंले तर वावे ठरणार नाही.

दूध आणि दही-

दूध आणि दही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. दुधात असलेले कॅल्शियम आपल्याला हाडे तयार करण्यास मदत करते. हे स्नायू तयार करण्यास देखील मदत करते. अनेक दुग्धजन्य पदार्थ कॅन्सरचा धोका वाढवतात. यामुळे दूध, दही, पनीर, चीज वगैरे खाण्याच्या अगोदर नक्कीच विचार करा. कुठलाही पदार्थ प्रमाणात खाणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र, अतिरेक झाल्यावर समस्या वाढण्यास सुरूवात होतेच.

बटाटे –

बटाट्यामध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरस असतात. पण जेव्हा बटाट्यापासून चिप्स बनवले जातात तेव्हा त्यात मिसळलेले अतिरिक्त मीठ कॅन्सरचे कारण असते. यामुळे बटाट्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे. मात्र, बटाट्यापासून तयार होणारे खाद्यपदार्थ जसे की चिप्स वगैरे जास्त प्रमाणात खाणे 100 टक्के कमी करा. कारण यामुळे शरीरातील मीठ वाढण्याची शक्यता असते.

मासे –

माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. भरपूर प्रथिने असतात. माशांमध्ये अनेक फायदेशीर घटक देखील आढळतात. पण अनेक ठिकाणी मासे जास्त काळ चांगले राहावेत म्हणून त्यात प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात. जे आपल्या शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळेच कॅन्सरचा धोका अधिक प्रमाणात निर्माण होतो. यामुळेच जरीही मासे खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, मांशांमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असतेच.