Urine Infection | महिलांनाच जास्त युरिन इन्फेक्शन का होते? ही घ्या कारणं अन्‌ उपाय

| Updated on: Apr 08, 2022 | 11:35 AM

पुरुषांपेक्षा महिलांना युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. महिलांचे मूत्रमार्ग खूपच लहान असतात. ज्यामुळे बॅक्टेरिया सहजपणे युरीन पाईपमध्ये जातात. अशा वेळी लघवी करताना झालेल्या काही चुका ही समस्या अधिक वाढवण्याचे काम करु शकतात.

Urine Infection | महिलांनाच जास्त युरिन इन्फेक्शन का होते? ही घ्या कारणं अन्‌ उपाय
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

मुंबई : लघवी करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर ते आरोग्यासाठी खूप धोकेदायक ठरू शकते. विशेषतः महिलांना या समस्येला अधिक सामोरे जावे लागते. लघवी करताना झालेल्या काही चुकांमुळे युरिन संबंधित संसर्गाच्या समस्या वाढविण्याचे काम करीत असतात. महिलांमध्ये (women) हे प्रमाण अधिक असल्याने यातून अनेक आरोग्यविषयक समस्या (Health problems) निर्माण होत असतात. स्त्रीरोग तज्ज्ञ प्रो. स्टर्गिओस स्टेलीओस डोमोचिस यांच्या मते, महिलांच्या शरीराच्या रचनेमुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. महिलांचे मूत्रमार्ग लहान असतात, ज्यामुळे बॅक्टेरिया सहजपणे युरिन पाइपमध्ये प्रवेश करू शकतात. बायोमेकॅनिकल दृष्टिकोनातून पाहिले तर याचा महिलांच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत ज्या महिलांना युरिन इन्फेक्शनच्या (urinary infections) समस्येला सामोरे जावे लागते, त्यांना इतरही अनेक समस्या असतात.

प्रोफेसर स्टर्गिओस यांनी ‘द सन’ला सांगितले, की स्त्रिया आयुष्यभर मासिक पाळी, गर्भधारणा आणि मेनोपोज आदी विविध शारीरिक बदलांना सामोरे जातात. या सर्व गोष्टींचा मूत्रमार्गाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत महिलांनी लघवी करताना आपल्या सवयी बदलणे आणि काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

1) प्रायव्हेट पार्ट साफ करताना विशेष लक्ष द्यावे

प्रोफेसर स्टर्गिओस म्हणाले की, प्रायव्हेट पार्ट साफ करताना मागच्या बाजूने पुढे पुसू नका. आपल्या गुद्द्वारात बरेच बॅक्टेरिया असतात, मागून पुढे पुसल्यास हे बॅक्टेरिया पुढे येतात व तुमच्या मूत्रमार्गात प्रवेश करतात. आणि यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे महिलांना प्रायव्हेट पार्टमध्ये जळजळ आणि वेदना होतात.

2) प्रायव्हेट पार्ट जास्त पुसणे

प्रायव्हेट पार्ट कोरडा ठेवण्यासाठी लघवी केल्यानंतर पुसणे आवश्यक असते. पण हे जास्त केल्याने तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते. असे केल्याने प्रायव्हेट पार्टच्या त्वचेत जळजळ आणि खाज येऊ शकते.

3) लघवीची वेळ ठरवणे

प्रोफेसर स्टर्गिओस म्हणतात, की लघवी करण्यासाठी वेळ ठरवणे खूप धोकादायक ठरू शकते. असे केल्याने मूत्राशय योग्य प्रकारे लघवी जमा करू शकत नाही. सामान्यत: 450 ते 500 मिली मूत्र मूत्राशयात जमा होते. पण जर तुम्ही दर अर्ध्या तासाने लघवीला गेलात तर त्यामुळे मूत्राशयात खूप कमी प्रमाणात लघवी जमा होते, त्यामुळे मूत्राशय नीट काम करू शकत नाही. आणि तुम्हाला प्रत्येक वेळी लघवी गेल्याची भावना येत राहते. लांबच्या प्रवासापूर्वी किंवा चित्रपट पाहण्याआधी लघवी करायला जाण्यात काही नुकसान नाही. पण सवयीप्रमाणे ते नियमितपणे करणे चांगले नाही.

4) लघवी आली तरी धरून ठेवणे

मूत्राशय पूर्ण भरले नसतानाही लघवी करण्याची सवय वाईट आहे. पण जेव्हा लघवी येते तेव्हा रोखून ठेवणे हीदेखील एक वाईट सवय आहे. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

5) भरपूर पाणी पिणे

दिवसातून 2 ते 3 लीटर पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते, जर तुम्ही व्यायाम करत असाल किंवा उन्हाळा असेल तर तुम्ही जास्त पाणी पिऊ शकता. पण असे बरेच लोक आहेत जे दिवसातून 6 ते 7 लीटर पाणी पितात. ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त प्रमाणात पाणी पिऊन तुम्ही स्वतःला जास्त हायड्रेट करण्याचा प्रयत्न करता. द्रवपदार्थाच्या जास्त वापरामुळे, मूत्राशय जास्त प्रमाणात लघवी तयार करू लागते. त्यामुळे वारंवार शौचालयात जावे लागते.

संबंधित बातम्या :

Water | जास्त पाणी पिणेही आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या किती असावे प्रमाण

मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी गंभीर; पायाला जखमा होत असतील तर काळजी घ्या

Eye care: वाढत्या वयातही ‘या’ चार पध्दतीने डोळ्यांची कार्यक्षमता सुधारा