Healt : कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणं आरोग्यासाठी हानिकारक, ‘या ‘आजारांना देताय निमंत्रण!

जास्त विचार केल्यामुळे तुम्हाला नीट झोप लागत नाही  भूक लागत नाही किंवा काही करण्याची इच्छा होत नाही. अशा अनेक गोष्टींमुळे तुम्हाला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा शकतो. तर आता आपण जास्त विचार केल्यामुळे कोणते आजार निर्माण होऊ शकतात याबाबत जाणून घेणार आहोत.

Healt : कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणं आरोग्यासाठी हानिकारक, या आजारांना देताय निमंत्रण!
| Updated on: Oct 01, 2023 | 11:48 PM

मुंबई : बहुतेक लोक प्रत्येक बारिक सारीक गोष्टीचा खूप विचार करत असतात. त्यामुळे अशा लोकांचे मन कधीही शांत राहत नाही. ते नेहमी विचार करत असतात किंवा ताणतणावात असतात. प्रत्येक गोष्टीचा जास्त प्रमाणात विचार केल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. जास्त विचार केल्यामुळे आपल्या मेंदूवर दबाव पडतो त्यामुळे शरीराच्या इतर अवयवांवर देखील त्याचा परिणाम होतो आणि अनेक गंभीर आजार निर्माण होतात.

जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार करत असाल तर तुम्ही डिप्रेशनचे बळी पडू शकता. डिप्रेशन हे अति विचार केल्यामुळे होते. जास्त विचार केल्यामुळे तुमच्या मेंदूतील क्रिया मंदावतात तसेच तुमच्या विचार क्षमतेवर देखील त्याचा गंभीर परिणाम होतो. तसेच जास्त विचार केल्यामुळे तुम्हाला डिप्रेशन येते आणि अशावेळी तुम्हाला एकटेपण वाटू शकते किंवा तुम्ही खूप दुःखी होऊ शकता.

जास्त विचार केल्यामुळे तुमचा बीपी वाढू शकतो. जास्त विचार केल्यामुळे ताण-तणाव येतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या हार्मोन्स वर होतो. तर या हार्मोन्समुळे तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि तुमचा बीपी देखील वाढतो. तसेच जास्त विचार केल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या हृदयावर होतो आणि त्यामुळे हृदयविकाराच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

जास्त विचार केला तर तुम्हाला झोप शांत लागू शकत नाही. जेव्हाही तुम्ही प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करत असता तेव्हा तुम्हाला ताणतणाव येतो, तुमचे मन अस्वस्थ होते अशावेळी तुम्हाला शांत झोप लागत नाही. तसेच पुरेशी झोप न घेतल्यामुळे तुम्हाला अनेक वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.