
तुम्ही लहान असताना अनेकदा ऐकलं असेल की, ‘रागाच्या भरात लाल-पिवळा का होत आहेस? ‘भीतीने त्याचा चेहरा पांढरा झाला.’ असे वाक्य तुमच्या अनेकदा कानावर पडतात. भावना आणि रंग यांचा काय संबंध आहे? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? रंग देखील आपला मूड आणि मन यांचा समतोल कसा साधतात, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या काय आहे कलर थेरपी. इंद्रधनुष्य पाहून तुम्हाला आनंद होत असेल, तुम्ही त्याकडे सारखे पाहत असाल तर रंग आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, हे तुम्ही नक्कीच मान्य कराल. तुम्ही जितका चमकदार रंग परिधान कराल तेवढं तुम्हाला चांगला वाटेल. काही रंग असे असतात जे पाहून किंवा परिधान करून तुम्हाला कंटाळवाणे वाटतात. म्हणूनच कलर थेरपी म्हणजे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे रंगांचा वापर करून आजार बरे होतात, त्याला क्रोमो थेरपी असेही म्हणतात. यामध्ये मानसिक आणि शारीरिक समस्या दूर करण्यासाठी रंग आणि...