सकाळी उठल्यानंतर किती ग्लास पाणी पिणे शरीरासाठी ठरेल फायदेशीर, आहार तज्ज्ञांकडून जाणून घ्या

सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे ही काही लोकांची सवय असते. पण ही सवय अनेक आरोग्यदायी फायदे देते. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारतेच, शिवाय डिहायड्रेशनही टाळता येते. पण सकाळी किती ग्लास पाणी प्यावे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया तज्ञांकडून रोज सकाळी किती ग्लास पाणी प्यावे.

सकाळी उठल्यानंतर किती ग्लास पाणी पिणे शरीरासाठी ठरेल फायदेशीर, आहार तज्ज्ञांकडून जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jun 17, 2025 | 1:35 PM

पाणी पिणे आपल्या शरीरासाठी खुप गरजेच आहे. कारण पाणी आपल्या आरोग्यासाठी महत्वाच घटक आहे. त्यामुळे बरेच लोकं सकाळी उठ्ल्यावर एक ग्लास पाणी पितात. त्याच बरोबर आपण अनेकदा आरोग्य तज्ञ आणि फिटनेस प्रशिक्षक हे आपल्याला दिवसाची सुरुवात करताना रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. असे मानले जाते की सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायल्याने शरीरातील साचलेले विषारी पदार्थ बाहेर पडतात, चयापचय सक्रिय होतो आणि पोट, त्वचा आणि मेंदूला फायदा होतो. पण प्रश्न असा पडतो की सकाळी उठल्यानंतर किती ग्लास पाणी प्यावे? एक ग्लास पुरेसे आहे की चार?

अशातच सकळी उठल्यावर पाणी कोमट करून प्यावे की थंड? आणि ते प्यायल्यानंतर लगेच नाश्ता करता येईल का? जर तुम्हीही या दुविधेत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आज आपण तज्ञांकडून जाणून घेऊया की सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती, त्याचे फायदे काय आणि या सवयीने तुमच्या आरोग्याला खरे फायदे देण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

सकाळी उठल्यावर किती ग्लास पाणी प्यावे?

यावेळी डॉ. शिखा शर्मा सांगतात की सकाळी 4 ते 5 ग्लास पाणी पिणे हे सर्वात चांगले आहे. आपल्या शरीराला दिवसभरात 2 लिटर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम साधे पाणी प्या तसेच तुम्ही जर डिटॉक्स वॉटर पित असतील तर काही वेळाने तुम्ही पिऊ शकता. तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही आधी 2 ग्लास साधे पाणी प्या. त्यानंतर तुम्ही 3 ग्लास डिटॉक्स वॉटर प्या. म्हणजेच, तुम्ही त्यात लिंबू, मध, दालचिनी, ओवा इत्यादी गोष्टी मिक्स करून डिटॉक्स वॉटर पिऊ शकता. कारण पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते आणि अनेक प्रकारचे आरोग्य फायदे देखील देते.

सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याचे फायदे

डॉ. शिखा शर्मा यांच्या मते, सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी पिणे ही एक अतिशय प्रभावी आरोग्यदायी सवय मानली जाते. ही सवय शरीराची नैसर्गिक स्वच्छता करण्यास मदत करते आणि दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. जेव्हा आपण रात्रभर झोपतो तेव्हा शरीर डिहायड्रेट होते आणि आत असलेले विषारी पदार्थ बाहेर पडण्याची वाट पाहत असतात. याकरिता सकाळी सर्वात आधी पाणी प्यायल्याने यकृत आणि मूत्रपिंडासारखे अवयव सक्रिय होतात आणि चयापचय गतिमान होते. ते पचन सुधारण्यास, बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनण्यास देखील मदत करते.

कोणत्या प्रकारचे पाणी पिणे जास्त फायदेशीर आहे?

डॉ. शिखा शर्मा सांगतात की शरीराच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पाणी प्यायले जाते. जसे की वजन कमी करण्यासाठी, तुम्ही लिंबू किंवा मध हे पाण्यात मिक्स करून तयार पाणी पिऊ शकता. वजन कमी करण्यासाठी पाण्यात लिंबू आणि मधाचा वापर बऱ्याच काळापासून केला जात आहे, जो प्रभावी देखील आहे. ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी त्रिफळा पावडर मिक्स करून पाणी प्यावे. यामुळे पोट साफ होते आणि गॅस आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी मेथीचे पाणी प्यावे. तर ज्या लोकांना कोलेस्टेरॉलची समस्या सतावत आहेत त्यांनी तमालपत्र किंवा कढीपत्त्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)