औषधी गुणधर्म असलेल्या ‘या’ घरगुती गोष्टी वापरा, सर्दी खोकल्यापासून होईल सुटका

| Updated on: Dec 10, 2020 | 3:31 PM

औषधी गुणधर्म असलेल्या वस्तूंचा वापर केल्यास आपण या सर्दी आणि इतर आजारांपासून मुक्त होऊ शकतो. (Cold and Cough)

औषधी गुणधर्म असलेल्या या घरगुती  गोष्टी वापरा, सर्दी खोकल्यापासून होईल सुटका
Follow us on

ऋतू बदलला की त्यासोबत वेगवेगळे आजारांची सुरुवात होते. बदललेल्या वातावरणामुळे सर्दी होणं सामान्य गोष्ट आहे. सर्दी आणि इतर आजार आपल्याला हैराण करतात. या आजारांपासून सुटका होण्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो. वेगवेगळी औषध आणून ती खातो. मात्र, आपल्या घरातच स्वयपांकघरात औषधी गुणधर्म असलेल्या गोष्टी असतात. औषधी गुणधर्म असलेल्या वस्तूंचा वापर केल्यास आपण या सर्दी आणि इतर आजारांपासून मुक्त होऊ शकतो. मात्र, आपण या गोष्टींबाबत अनभिज्ञ असतो.

सर्दी आणि इतर आजारांवर गुणकारी वस्तू

तुळस

सर्दी झाल्यानंतर आपण तुळशीची 5 ते 7 पाने, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडीसी काळ्या मिर्चीची पावडर पाण्यात टाकून उकळून घ्यावी. उष्णता दिल्यानंतर पाणी अर्धे शिल्लक राहिल्यानंतर ते प्यावे. यामध्ये कडूपणा कमी करण्यास आपण थोडासा गुळ टाकू शकतो. याचं नियमितपणे सेवण केल्यास सर्दी जाऊ शकते. तुळशीची पाने आणि जीरे अर्धा लीटर पाण्यात उकळून घेऊन पिल्यानंतर सर्दी खोकला दूर होईलच पण प्रतिकार शक्तीदेखील वाढेल.

हळद

आल्याप्रमाणेच आपण कच्ची हळद खाल्यास सर्दी खोकल्यातून नक्की आराम मिळेल. आले, हळद, मीठ आणि लिंबाची चटणी देखील फायदा पोहोचवते. सर्दी खोकला असल्यास रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधामध्ये हळद टाकून पिल्यास तेही गुणकारी ठरते.

लिंबू

लिंबाचा रस काढल्यानंतर त्याचा राहिलेला भाग स्वच्छ पाण्यात ठेवावा. त्यानंतर त्या पाण्याचा वापर केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते. कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून पिल्यास सर्दी आणि खोकल्यामधून आराम मिळतो. यासोबत गळ्याला आराम पडतो. अर्धा चमचा लिंबामध्ये वेलची पावडर टाकल्यास लिंबाच्या रसाचे थेंब टाकून पिल्यास सर्दी जाऊ शकते.

आले आणि लसूण

कच्चा लसूण खाल्यामुळे खोकला दूर होऊ शकतो. कच्चा लूसण खाण्यात त्रास होत असेल तर पाण्यात टाकून उकळून घेऊन त्यानंतर त्यामध टाकून पिल्यास फायदा होऊ शकतो. एक चमचा मधामध्ये दोन लसूण पाकळ्या बारीक करुन घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

काळी मिरची आणि मनुके

अर्धा चमचा काळी मिरची पावडर देशी तूपात मिसळून घाल्यास खोकल्यातून आराम मिळू शकतो. वहीं, 7-8 मुनके पाण्यात गरम करावे आणि त्यानंतर थंड करून प्यावे. मनुके पाण्यातून काढून खावेत. यामुळे सर्दीतून सुटका होऊ शकते.

टीप: सर्दी आणि इतर आजार गंभीर असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

संबंधित बातम्या:

चेहऱ्यावर तेज, वजन कमी, बद्धकोष्ठता पासून सुटका, सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे कित्येक फायदे

Diet Tips | जेवणाच्या पद्धतीत ‘हे’ बदल करा आणि वजन वाढीच्या समस्येपासून मुक्ती मिळावा!