Diet Tips | जेवणाच्या पद्धतीत ‘हे’ बदल करा आणि वजन वाढीच्या समस्येपासून मुक्ती मिळावा!

आपल्याला आपले वजन कमी करायचे असेल आणि शरीर संतुलित राखायचे असेल तर, ‘हे’ उपाय माहित असणे आवश्यक आहे.

Diet Tips | जेवणाच्या पद्धतीत ‘हे’ बदल करा आणि वजन वाढीच्या समस्येपासून मुक्ती मिळावा!

मुंबई : दिवसाच्या सुरुवातीपासून ते रात्रीपर्यंत काय आहार असाव, हे बहुधा आपल्या विचारांवर अवलंबून असते. कारण आपल्यालाही आपल्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यावी लागते. जर तुम्ही खूप खादाड आहात आणि दिवसाच्या कुठल्याही वेळेत सतत खात असाल तर, तुमच्या आरोग्यासाठी ते चांगले नाही. आपली भुकेसंबंधित इच्छा नियंत्रित करणे आणि निरोगी आहार खाणे अधिक महत्त्वाचे आहे (Diet Tips for healthy body and weight loss).

दिवसाच्या सुरुवातीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत आपण बरेच पदार्थ खात असतो. यात तळलेले, भाजलेले, गोड, खारट, आंबट किंवा मसालेदार अशा सगळ्याप्रकारचे पदार्थ असू शकतात. अशावेळी बरेच लोक शरीरासाठी हानिकारक ठरणारे अन्नपदार्थ खातात आणि पोट भरतात. ज्यामुळे आपले वजन कमी होण्याऐवजी वाढायला सुरुवात होते. आपल्याला आपले वजन कमी करायचे असेल आणि शरीर संतुलित राखायचे असेल तर, ‘हे’ उपाय माहित असणे आवश्यक आहे.

लहान डिनर प्लेट्सचा वापर

ठराविक वेळेत वजन कमी करण्यासाठी आपण मर्यादित प्रमाणात कॅलरीचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. अशावेळी जेवणाचे ताट मोठे असल्याने, आपल्या पोटात जाणारे अन्न आणि परिणामी कॅलरीहे जास्त प्रमाणात शरीरात प्रवेश करतात. म्हणून, जास्त प्रमाणात खाणे नेहमी टाळले पाहिजे. जेवणासाठी नेहमीच लहान आकाराच्या प्लेट्स वापरा आणि त्यामध्ये पौष्टिक आहारच ग्रहण करा (Diet Tips for healthy body and weight loss).

तेलाच्या वापराबाबत सावधगिरी

स्वयंपाक करताना तेलाच्या कॅलरीचे प्रमाण दुर्लक्षित केले जाते. ही चूक सहसा प्रत्येक घरात दिसून येते. जर आपण तेलावर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ असाल तर, आपले वजन कमी होणे खूप कठीण आहे. म्हणून ऑलिव्ह ऑईल, नारळ तेल किंवा शुद्ध तूप यासारख्या निरोगी तेलांचा वापर करा. परंतु, तेल निवडताना देखील त्यातील चरबीचे प्रमाण लक्षात घ्या.

रात्रीच्या जेवणापूर्वी पाणी प्या

आपल्या पाणी पिण्याची योग्य पद्धत माहित नाही, म्हणूनच आपण पिण्याच्या पाण्याचे महत्त्व देखील कमी लेखतो. जेव्हा आपल्या शरीराराला पाण्याची गरज असते, तेव्हा पाणी न पिता आपण कधीही वाटेल तेव्हा पाणी पितो. पाणी केवळ आपल्याला हायड्रेटेड ठेवत नाही तर, आपल्या आहारास परिपूर्ण देखील बनवते. तसेच भेकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. म्हणून रात्रीच्या जेवण्याच्या 30 मिनिटे आधी एक ग्लास पाणी प्यावे (Diet Tips for healthy body and weight loss).

रात्री एकत्र जेवा

अन्न खाताना आपले लक्ष इतर गोष्टींकडे वळवू नये. यामुळे आपल्याल भुकेचा अंदाज येत नाही आणि आपण अधिक जेवतो. म्हणून लक्षात ठेवा की, जेवताना आपण टीव्ही सारख्या लक्ष विचलित करणार्‍या गोष्टी समोर बसू नये. आपण काळजीपूर्वक जेवण नीट चावून खाल्ल्यास ही सवय नेहमीच आपल्या कॅलरी संतुलित ठेवते आणि वजन वेगाने कमी करते. तसेच कुटुंबासोबत एकत्र बसून जेवल्याने देखील आपण लक्ष विचलित होणार नाही.

लवकर जेवा

रात्रीचे जेवण जेवल्यानंतर लवकर झोपल्यामुळे आपले वजन कमी होऊ शकत नाही. म्हणून झोपण्याच्या वेळेच्या किमान दोन तास आधी जेवावे. वजन कमी करायचं असेल, तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जेवणे फायदेशीर ठरते.

(Diet Tips for healthy body and wight loss)

Published On - 3:21 pm, Wed, 9 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI