शरीरात ‘या’ गोष्टीची कमतरता असल्यास थंडीच्या दिवसात हाता-पायांची बोटं पडतात निळी

तुमच्या शरीरात या गोष्टीची कमतरता जाणवल्यास हाताच्या आणि पायांची बोटं जेव्हा थंड हवेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचा धमन्या आकुंचन पावतात. त्यामुळे बोटांना रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे हाता-पायांची बोट निळी पडतात. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की शरीरात कोणत्या गोष्टींची कमतरता असल्यास ही समस्या सतावते?

शरीरात या गोष्टीची कमतरता असल्यास थंडीच्या दिवसात हाता-पायांची बोटं पडतात निळी
Fingers and Toes Turning Blue
| Edited By: | Updated on: Dec 12, 2025 | 10:44 PM

हिवाळा सुरू होताच अनेक हंगामी आजार आपल्याला सतावू लागातात. अशातच आपण आपल्या आहारात हंगामानुसार बदल करत असतो जेणेकरून आपले शरीर तंदूरस्त राहील. पण कधी कधी हिवाळा ऋतू सुरू झाला की वातावरणात गारवा वाढतो आणि यामुळे अनेक लोकांची बोटं अचानक पांढरे, निळी किंवा जांभळ्या रंगाचे होतात. यासोबत हाता-पायांच्या बोटांना मुंग्या येणे, वेदना आणि सूज येते. लोकं अनेकदा याला सामान्य सर्दी असेल असं म्हणून दुर्लक्ष करतात , परंतु हे रेनॉड सिंड्रोमचे लक्षण असू शकते. ही समस्या विशेषतः 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये दिसून येते.

विशेषतः जी लोकं गरम आणि थंड पाण्यात बराच वेळ काम करतातकिंवा थंड वातावरणात बराच वेळ बाहेर राहून काम करतात त्यांच्याही हाता-पायांची बोटं सुन्न आणि काळी निळी पडतात. तर थंडीत हाता -पायांची बोटं निळी पडण्याचे कारण काय आहे ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

थंडीत बोटं निळी का होतात?

रेनॉड सिंड्रोममध्ये जेव्हा तुमच्या हातां व पायांच्या बोटांचा संर्पक जेव्हा थंडीच्या दिवसात थंड पाण्यात व थंडीच्या संपर्कात आल्यावर बोटांमधील धमन्या आकुंचन पावतात. त्यामुळे बोटांना शुद्ध रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. अशातच जेव्हा ऑक्सिजनची कमतरता जाणवल्यास प्रथम बोटं पांढरी, नंतर निळी आणि नंतर लाल होतात. रक्ताभिसरण थांबले की बोटं सुन्न होतात, बोटांची जळजळ होते आणि वेदना होतात. शिवाय असे जर वारंवार घडले तर बोटांवर जखमा देखील तयार होऊ शकतात. ही समस्या अचानक ताणामुळे देखील उद्भवू शकते आणि काही लोकांना 60 ते 70 अंश फॅरेनहाइटच्या मध्यम थंड तापमानात देखील लक्षणे जाणवू लागतात .

कोणत्या लोकांना सर्वात जास्त धोका आहे?

हॉटेल आणि केटरिंग उद्योगातील लोकं , व्हाइब्रेटिंग टूल्स वापरणे कामगार , वारंवार गरम आणि थंड पाण्याच्या संपर्कात हात ठेवणारे आणि घरकाम करणाऱ्या महिला अशा सर्वांना थंडीच्या दिवसात बोटं निळी पडण्याचा धोका सर्वाधिक असतो. डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात हॉस्पिटलमध्ये बोटांची ही समस्या सतावल्यास सुमारे 60 टक्के रुग्ण येतात. जर थंडीच्या दिवसात हाता पायांची बोटं निळी पडल्यास त्यावर दुर्लक्ष केल्याने बोटं काळेही पडू शकतात आणि यामुळे बोटांच्या ऊतींचे नुकसान होऊ शकते.

हे कसे रोखायचे?

रेनॉडचा संसर्ग टाळण्यासाठी खूप थंड पाण्यात काम न करण्याचा प्रयत्न करा, घरात अनवाणी चालणे टाळा, रेफ्रिजरेटरमध्ये हात ठेवणे किंवा त्याच्या समोर उभे राहणे टाळा . शिवाय डिटर्जंट किंवा कपडे धुण्याचा साबण थेट हातांना लावणे टाळा, लोकरीचे हातमोजे आणि मोजे घाला आणि भांडी धुताना नेहमी रबरचे हातमोजे घाला. सुरुवातीला रेनॉडचा आजार औषधाने बरा होऊ शकतो , परंतु काही प्रकरणांमध्ये, बायोफीडबॅक तंत्रांचा वापर करून हातांचे तापमान नियंत्रित केले जाते . जर औषधांनी आराम मिळत नसेल, तर समस्या आणखी बिकट झाल्यास शस्त्रक्रिया करण्याचीही गरज भासू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)