डबल चिनमुळे त्रासलात ? ‘हा’ व्यायाम ठरेल फायदेशीर

| Updated on: Dec 01, 2022 | 3:18 PM

डबल चिनचा त्रास हा बऱ्याचदा लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यापासून मुक्ती हवी असेल तर नियमित व्यायाम करणे फायदेशीर ठरेल.

डबल चिनमुळे त्रासलात ? हा व्यायाम ठरेल फायदेशीर
Follow us on

नवी दिल्ली – गळ्याजवळ लोंबणारी अथवा टकणारी सैल त्वचा यामुळे कोणाचेही व्यक्तिमत्त्व बिघडू शकते. याला डबल चिन (हनुवटी) (double chin) असेही म्हणतात. ज्या लोकांचे वजन गरजेपेक्षा जास्त असते किंवा ज्यांचा चेहरा जाड असतो, अशा लोकांना डबल चिन असते. महिलांमध्ये डबल चिनची समस्या जास्त दिसून येते. मेकअप, हेअर स्टाइल आणि हाय नेकचे कपडे यामुळे डबल चिन झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो काही कायमस्वरूपी उपाय ठरत नाही. त्यामुळे डबल चिन कमी करण्यासाठी शॉर्ट कटचा वापरण्याऐवजी, व्यायाम (exercise), स्ट्रेचिंग, मालिश आणि निरोगी आहार (proper diet) यासारख्या उपायांमुळे दीर्घकालीन फायदे मिळू शकतात.

मानेची चरबी कमी करण्यासाठी बरेच व्यायाम आहेत जे अधिक फायदेशीर ठरू शकतात. ते नियमितपणे केल्यास मान सुडौल होऊ शकते.

डबल चिन म्हणजे काय ?

हे सुद्धा वाचा

हेल्थलाइन नुसार, डबल चिन ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हनुवटीखाली फॅट्स किंवा चरबीचा थर गोळा होतो, तेव्हा ही समस्या उद्भवते. वजन वाढल्यामुळे बऱ्याच वेळेस डबल चिनचा त्रास उद्भवतो. मात्र बऱ्याच वेळेस डबल चिन ही आनुवांशिकतेमुळे किंवा सैल त्वचेमुळेसुद्धा होऊ शकते. व्यायामाच्या सहाय्याने डबल चिन कमी करता येऊ शकते.

स्‍ट्रेट जॉ जूट

हा व्यायाम करण्यासाठी डोके मागे वाकवून छताकडे पहावे. हनुवटीखाली ताण निर्माण व्हावा यासाठी खालचा जबडा पुढे आणावा. 10 आकडे मोजेपर्यंत या पोझिशनमध्ये थांबावे. आपला खालचा त्यानंतर डोके पुन्हा सामान्य स्थितीत आणावे. ही क्रिया 15 ते 20 वेळा करावी.

बॉल एक्‍सरसाइज

हा व्यायाम करण्यासाठी 8 ते10 इंचांचा बॉल घ्यावा. तो हनुवटीखाली ठेवून दाबा. ही कृती पुन्हा 5-10 वेळा करावी.

चिन पुश स्‍माइल

हे करण्यासाठी खुर्चीवर किंवा सोफ्यावर आरामात बसा. पाठीला आधार देण्यासाठी मागे उशी ठेवावी. नंतर बोटांच्या टोकावर हनुवटीवर ठेवावी. खालचा जबडा बाहेरच्या बाजूला ठेवा. नंतर हनुवटी हळुवारपणे दाबून, ओठ उघडून थोडे हसावे. 3 सेकंद अशाच स्थितीत थांबावे त्यानंतर डोकं पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणावे. ही कृती 15 वेळा करावी.

टंग स्‍ट्रेल

हा व्यायाम करण्यासाठी सरळ पुढे पाहून आपली जीभ शक्य तितकी बाहेर काढावी. नंतर जीभ नाकाच्या दिशेने वर उचलावी. ही कृती करत 10 सेकंद वाट बघा. हे 10 ते 15 वेळा पुन्हा करावे.

कसा असावा आहार ?

कैसी होनी चाहिए डाइट

– आहारात अधिक भाज्या व फळांचा समावेश करावा

– हेल्दी फॅट्स खावेत

– कॅलरीज कमी खा

– प्रोटीन्सचे सेवन करावे.

डबल चिनच्या समस्येमुळे आपले व्यक्तीमत्व खराब होऊ शकते. त्यामुळे हे कमी करण्यासाठी योग्य आहार घ्यावा व व्यायाम करावा. मात्र कोणताही व्यायाम करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.