चहामध्ये आलं टाकण्याऐवजी मिक्स करा ‘ही’ एक गोष्ट, चव आणि आरोग्याचा एक उत्तम मिलाफ
भारतात चहाप्रेमी खुप आहेत. कारण कोणताही ऋतू असो चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरूवात होत नाही. अशातच उन्हाळ्यात आल्याचा चहा जड वाटू शकतो. त्यामुळे आजच्या लेखात आपण एका अशा चहाबद्दल जाणून घेणार आहोत, जो तुमच्या शरीरात उष्णता निर्माण न करता चहाची चव आल्यासारखीच असेल.

आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठल्यावर पहिले चहा हा लागतोच. त्यातच अशी काही लोकं आहेत ज्यांची दिवसाची सुरूवात ही चहा पिऊनच होते. त्यातच काहींना चहामध्ये आलं घालून केलेला चहा प्यायला लागतो. मात्र सध्याच्या वाढत्या उष्णतेचा पारा लक्षात घेता आणि आल्याचा उष्ण स्वभावामुळे त्याचा वापर जपून करावा असा सल्ला दिला जातो. कारण या दिवसात आल्याचा चहा प्यायल्याने पोटात जडपणा येऊ शकतो, पोट फुगणे आणि गॅस होणे यांसारखे त्रास होऊ शकतात, तसेच शरीरातील उष्णताही वाढू शकते. ज्यांना रोज आल्याचा चहा पिण्याची सवय त्यांचासाठी आल्याशिवायही चहाची चव अप्रतिम लागू शकते. यासाठी तुम्हाला फक्त सुंठाचा एक तुकडा चहामध्ये मिक्स करायचा आहे, जे सामान्यतः मसाला म्हणून वापरले जाते.
सुंठ हा आल्याचाच एक प्रकार असला तरी, वाळवल्यानंतर त्याचे गुणधर्म आणि पौष्टिक मूल्य लक्षणीयरीत्या बदलतात. त्यामुळे, उन्हाळ्यात चहामध्ये त्याचा वापर केल्यास चव आणि आरोग्य दोन्ही फायदे मिळतात. या लेखात चहामध्ये सुंठ कशी वापरावी आणि त्याचे फायदे काय आहेत, हे आपण जाणून घेऊयात.
सुंठमधील पोषक तत्वे आणि फायदे
सुंठ केवळ चवदारच नाही तर पोषक तत्वांनीही समृद्ध आहे. त्यात कर्बोदके, फायबर, प्रथिने आणि अल्प प्रमाणात आरोग्यदायी फॅट असते, जे ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात. तसेच सुंठ लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस यांसारख्या आवश्यक खनिजांचा एक चांगला स्रोत आहे. ज्यामुळे त्यांच्या सेवनाने निरोगी हाडे, स्नायू आणि रक्त परिसंचरण राखण्यासाठी उपयुक्त ठरतात.
सुंठ चहाचे फायदे काय आहेत?
आयुर्वेदात सुंठ पचनासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. उन्हाळ्यात लोकांना अनेकदा गॅस, अपचन आणि पोट जड होण्यासारख्या समस्यांचा त्रास होतो. अशा परिस्थितीत तुम्ही जर चहामध्ये सुंठ टाकून प्यायलात तर पोटाला आराम देण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत करू शकतो. शिवाय सुंठचे गुणधर्म थकवा कमी करण्यासाठी आणि दिवसभर ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. हा चहा प्यायल्याने शरीरातील उष्णता वाढण्यासही प्रतिबंध होतो. आयुर्वेदिक तज्ञांच्या मते सुंठ पचनशक्तीलाही मदत करते.
चहामध्ये सुंठ कशी वापरावी
चहामध्ये सुंठ वापरणे देखील खूप सोपे आहे. फक्त चहाच्या पाण्यात सुंठ ठेचून टाका. नंतर त्यात साखर, चहापावडर आणि दूध मिक्स करून छान उकाळा घ्या. तुम्ही सुंठ पावडर देखील वापरू शकता. दोन्हीमधून सारखेच फायदे आणि पोषण शरीराला प्रदान करतात.
येथे पोस्ट पाहा..