High Cholesterol: वाढत्या कोलेस्ट्रॉलला घालायचा आहे आळा ? थंडीत ‘हे’ पदार्थ खाणं टाळा

| Updated on: Dec 22, 2022 | 11:28 AM

थंडीच्या दिवसात बरेच जण गरमागरम चहा-कॉफी आणि चॉकलेटचे भरपूर सेवन करतात. या पदार्थांमध्ये साखर भरपूर असते, तसेच सॅच्युरेटेड फॅट्सही अधिक असतात. त्यांचे अधिक सेवन केल्यास हृदयावर परिणाम होऊ शकतो.

High Cholesterol: वाढत्या कोलेस्ट्रॉलला घालायचा आहे आळा ? थंडीत हे पदार्थ खाणं टाळा
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – हिवाळ्यात निरोगी आणि तंदुरुस्त (fit and healthy) राहणे हे अवघड काम असते. त्यासाठी आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन नियमितपणे काळजी घ्यावी लागते. विशेषत: हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाच्या (diabetes) रुग्णांनी स्वतःची संपूर्ण काळजी घेणे गरजेचे असते. निष्काळजीपणा केल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम (effect on health) होतो. खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. त्यामुळे वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवावे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. यासाठी आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. चुकीच्या आहारामुळे कोलेस्ट्रॉल वाढू लागते.

जर तुम्हालाही वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवायचे असेल तर काही पदार्थांचे सेवन बिलकूल करू नका.

गोड पदार्थ टाळा

हे सुद्धा वाचा

हिवाळ्यात लोक गरमागरम चहा, कॉफी आणि चॉकलेटचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात. मात्र या पदार्थांमध्ये साखर मुबलक प्रमाणात असते. तसेच सॅच्युरेटेड फॅटही त्यामध्ये जास्त असते. या पदार्थांच्या अतिसेवनाने हृदयावर वाईट परिणाम होतो. म्हणूनच थंडी असो किंवा कोणताही ऋतू एकंदरच गोड पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. तसेच ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हे पदार्थ खावेत.

जंक फूडपासून दूर रहावे

आजकाल बहुतांश लोक हे जंक फूडवर जास्त अवलंबून आहेत. मात्र त्याच्या सेवनाने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जंक फूडमुळे शरीरातील चरबी आणि कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे जंक फूड आणि रस्त्यावर मिळणारे, तळलेले पदार्थ खाणे टाळावे. फास्ट फूडचे दीर्घकाळ सेवन केल्याने यकृतासंबंधित आजार होऊ शकतात. तुम्हाला खूप इच्छा झाली तर काही पदार्थ घरी बनवून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता.

रेड मीट खाऊ नका

रेड मीट म्हणजेच लाल मांस हे प्रथिनांचे मुख्य स्त्रोत मानले जाते. मात्र, हिवाळ्यात लाल मांस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नसते. या काळात आपले लिव्हर (यकृत) हे लाल मांस पचवण्यासाठी सक्षम नसते. तसेच त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढू लागते. म्हणूनच हिवाळ्याच्या दिवसात लाल मांस टाळा. तसेच चीज आणि तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन करू नका.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)