Tips for parents: तुमची ‘मुलगी’ वेळे आधीच तारुण्यात येत आहे का? ही लक्षणे दिसताच पालकांनी व्हावे सावध!

| Updated on: Aug 04, 2022 | 10:39 PM

Tips for parents: मुलींमध्ये तारुण्य लवकर सुरू होणे आजकाल सामान्य आहे. अशा स्थितीत, आपल्या मुलींचे तारुण्य लवकर का सुरू होत आहे. मुली वेळेआधीच का वाढू लागल्या आहेत, अशी चिंता अनेक पालकांना असते. संशोधकांनी याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, जाणून घ्या, मुलींमध्ये तारुण्य लवकर येण्याचे कारणे.

Tips for parents: तुमची ‘मुलगी’ वेळे आधीच तारुण्यात येत आहे का? ही लक्षणे दिसताच पालकांनी व्हावे सावध!
Follow us on

मुंबईः तारुण्य म्हणजे मुला-मुलींमध्ये शारीरिक बदल (Physical changes) सुरू होण्याचा काळ. पौगंडावस्थेत शरीरात अनेक अवयव विकसित होतात आणि अनेक बदलही दिसून येतात. ही प्रक्रिया सामान्यतः मुलींमध्ये 10 ते 14 वर्षांच्या वयात सुरू होते, तर मुलांमध्ये ती 12 ते 16 वर्षांच्या वयात सुरू होते. तारुण्य दरम्यान, मुली आणि मुलांमध्ये वेगवेगळे बदल दिसून येतात. वयात येताना मुलींमध्ये स्तनाचा आकार वाढतो. परंतु बदलत्या काळानुसार मुलींमध्ये अकाली यौवनाची (Premature puberty) अनेक प्रकरणे पाहायला मिळत आहेत. यासाठी पालकही अनेकदा डॉक्टरांकडे जातात. असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका पालकाने डॉक्टरांना सांगितले की, त्यांची मुलीच्या स्तनांचा आकार (Breast size) वाढू लागला आहे. आता ती फक्त 7 वर्षांची आहे आणि ती अजूनही बाहुल्यांसोबत खेळते. अशा परिस्थितीत दूध आणि मांसामध्ये असलेले हार्मोन्स याला जबाबदार आहेत का? किंवा अन्नात प्रतिजैविक असतात? यासोबतच पालकांकडून असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे की, त्यांच्या मुलीला वयाच्या ८ व्या वर्षी मासिक पाळी सुरू होईल का?

बालरोगतज्ञ आणि एंडोक्राइनोलॉजिस्ट म्हणाले, मी अशा अनेक मुली पाहिल्या आहेत ज्यांना अगदी लहान वयात यौवनात जावे लागते. आपल्याला माहीत आहे की, ज्या मुलींना अकाली यौवनावस्थेत जावे लागते, त्यांना भविष्यात नैराश्य, लठ्ठपणा, खाण्याचे विकार तसेच कर्करोग अशा अनेक प्रकारच्या वैद्यकीय आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.

यौवनाची चिन्हे

पुष्कळ लोक मासिक पाळी येण्याला यौवनाची सुरवात मानतात. पण, स्तन आणि जघनाचे केस (खासगी भागावरील केस) विकसित होणे हे तारुण्यचे पहिले लक्षण आहे. काखेचा वास, हातावरील केस, पुरळ आणि अगदी मूड बदलने ही यौवनाची वैद्यकीय लक्षणे नसून त्याच्याशी संबंधित आहेत. जुन्या काळात, वयाच्या 8 वर्षापूर्वी तारुण्य दिसणे हे असामान्य मानले जात होते. परंतु, आजच्या काळात 15 टक्के मुलींना 7 वर्षाच्या वयापर्यंत स्तन विकसित होऊ लागतात आणि 10 टक्के मुलींना खासगी भागात केस येण्यास सुरवात होते. वयाच्या 8 व्या वर्षी, 25 टक्के मुलींच्या स्तनांचा आकार वाढू लागतो, तर 20 टक्के मुलींना केस येऊ लागतात.

लवकर यौवनात येण्याची कारणे

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, यौवन लवकर सुरू झाल्यास लठ्ठपणाचा धोका लक्षणीय वाढतो. चरबी ही अतिशय सक्रिय संप्रेरक ग्रंथी आहे आणि चरबीच्या पेशी इतर संप्रेरकांना इस्ट्रोजेनमध्ये रूपांतरित करतात. मुलींमध्ये अधिक चरबीयुक्त ऊतकांमुळे, यौवन लवकर सुरू होण्याची शक्यता लक्षणीय वाढते. मात्र, यावर संशोधकांचे म्हणणे आहे की, लठ्ठपणा हे तारुण्य लवकर येण्याचे मुख्य कारण आहे की, त्यामागे आणखी काही कारण आहे, हे त्यांना माहीत नाही.

तणाव आणि तारुण्य

याबाबत अनेक संशोधने करण्यात आली आहेत, ज्यामध्ये तणाव आणि तारुण्य लवकर येण्याचा संबंध आढळून आला आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की, ज्या मुली कौटुंबिक हिंसाचारात वाढतात आणि घरात पिता नसतो त्यांची मासिक पाळी इतर मुलींच्या तुलनेत अधिक लवकर येते. यामागील सिद्धांत असा आहे की, जेव्हा तुम्ही तणावाखाली बराच वेळ घालवता तेव्हा मेंदू लवकरात लवकर पुनरुत्पादन सुरू करतो.यावरुन हे स्पष्ट आहे की, पुनरुत्पादनासाठी जबाबदार हार्मोन्स मेंदूमध्ये विकसित होतात आणि हे हार्मोन्स लवकर यौवनासाठी जबाबदार असतात.

पालकांनी काय करावे

जर तुमच्या मुलांमध्ये लवकर यौवनाची लक्षणे दिसायला सुरुवात झाली असेल, तर तुम्ही या स्थितीत घाबरू नका. जर तुम्ही घाबरत असाल तर त्याचा तुमच्या मुलीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

तुम्ही तुमच्या मुलीशी याबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे.

तुमच्या मुलीला यौवनाची लक्षणे दिसू लागली आहेत, पण तुम्ही तिचे वय लक्षात घेऊन वागले पाहिजे. जर तुम्ही त्याच्यासारखे मोठे वागू लागाल तर कदाचित तो नकारात्मक होईल.

मुलीच्या पेहरावाबद्दल पालकांना त्रास होऊ लागतो. ते नैसर्गीक असून याबाबत मनात शंका आणू नये.

तुमच्या मुलीच्या बॉडी लँग्वेजमध्ये काय बदल होत आहेत याकडे लक्ष ठेवावे लागेल.