corona vaccine : भारतात पाचवी लस दाखल, जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला परवानगी!

जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson and Johnson) या सिंगल डोस असणाऱ्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

corona vaccine : भारतात पाचवी लस दाखल, जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला परवानगी!
या शब्दाने गेल्या दोन वर्षांत अनेक विक्रम केले आहेत. पीटर सोकोलोव्स्की म्हणतात, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये 601 टक्क्यांनी जास्त 'व्हॅक्सिन' शब्द सर्च करण्यात आला. 2021 मध्ये दररोज त्यांचा डेटाबेसमध्ये 'व्हॅक्सिन' हा शब्द वारंवार येत राहिला. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिल्या डोसपासून या शब्दाची चर्चा वाढत गेली. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये 1,048 टक्क्यांनी जास्त हा शब्द सर्च केला गेला.
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 2:27 PM

नवी दिल्ली : जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson and Johnson) या सिंगल डोस असणाऱ्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. त्यामुळे भारतात आता कोरोनाविरोधी लढ्यासाठी 5 EUA लसी उपलब्ध आहेत. जॉन्सन आणि जॉन्सनची ही लस आल्यामुळे, आपाला सामूहिक लढा आणि बळकट होईल असं मनसुख मांडवीय म्हणाले.

ग्लोबल हेल्थकेयर कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने यापूर्वीच भारतात आपत्कालीन वापरासाठी लसीला परवानगी मिळावी यासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार आता ही परवागनी देण्यात आली आहे.

भारतात सध्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड, भारत बायोटिकची कोवॅक्सिन, रशियाची स्पुतनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि आता  जॉन्सन अँड जॉन्सन या लसी उपलब्ध आहेत.

85 टक्के प्रभावी

दरम्यान, जॉन्सन अँड जॉन्सनची ही लस 85 टक्के सुरक्षित आहे. सिंगल शॉट व्हॅक्सिन 85 टक्के सुरक्षा देते, असा दावा कंपनीचा आहे. ही लस दिल्यानंतर 28 दिवसांच्या आत मृत्यूदर कमी होतो, शिवाय रुग्णांना हॉस्पिटलमध्येही दाखल करण्याचं प्रमाण कमी होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे.

बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या सहयोगाने कंपनीने एक डोसवाली COVID-19 व्हॅक्सिन भारत आणि जगात मैलाचा दगड ठरेल, बायोलॉजिकल ई आमच्या जागतिक पुरवठा साखळीचा महत्त्वाचा भाग आहे,असं कंपनीने म्हटलं आहे.

लहान मुलांसाठी लवकरच लस 

सीरम इन्स्टिट्युटचे (Serum Institute) सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीरमची लहान मुलांसाठीची कोवोवॅक्स (Covovax) कोरोना लस लॉन्च होणार असल्याचं अदर पूनावाला यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत tv9 शी बोलताना त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या  

जगभरात सध्या किती लसी? महाराष्ट्राला कोणत्या देशातून कुठली लस मिळू शकते?

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांसाठी कोरोना लस, अदर पूनावाला यांची मोठी घोषणा