Health Tips : ताब्यांच्या भांड्यात पाणी पिणे आहे आरोग्यासाठी फायदेशीर; ‘या’ आजारांपासून मिळेल सुटका

तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे हे शरीरासाठी फायदेशीर असते असं म्हणतात. तांब्यातील गुणधर्मामुळे त्यामध्ये ठेवलेले पाणी पिणे शरीरासाठी लाभदायक ठरते. जाणून घेऊया, काय आहे त्यामागचे कारण.

Health Tips : ताब्यांच्या भांड्यात पाणी पिणे आहे आरोग्यासाठी फायदेशीर; 'या' आजारांपासून मिळेल सुटका
अजय देशपांडे

|

Aug 05, 2022 | 11:35 AM

Copper Vessel  : देवांची पूजा करताना बरेच जण तांब्याचे ताम्हन, भांडे, तांब्या, अशा अनेक भांड्याचा वापर करतात. मात्र तांब्याचा वापर येवढ्यासाठीच मर्यादित नाही. आजकाल बरेच जण तांब्याच्या भांड्यात (copper vessle) पाणी ठेवून त्याचे सेवन करताना दिसतात. तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे हे शरीरासाठी फायदेशीर (Beneficial for health) असते असं म्हणतात. तांब्यातील गुणधर्मामुळे त्यामध्ये ठेवलेले पाणी पिणे शरीरासाठी लाभदायक ठरते. म्हणून बऱ्याच घरातील ज्येष्ठ व्यक्ती तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ (boosts the immunity) होते. तसेच वजन कमी करायचे (helps to reduce weight) असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे, फायदेशीर ठरते. तांब्यामध्ये असे अनेक घटक असतात, जे पोटासाठी फायदेशीर मानले जातात. जाणून घेऊया, तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आणखी काय फायदे आहेत.

पचनसंस्था चांगली राहते

आपल्या शरीरातील पचनसंस्था चांगली असली की पोटाचे त्रास कमी होतात. अन्नाचे नीट पचन न झाल्यास जळजळ, अपचन, पोटदुखी, ॲसिडिटी असे अनेक त्रास होतात. त्यामुळे पचनसंस्था नीट ठेवायची असेल तर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे पोटातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत मिळते. तसेच अपचन, अल्सर सारखे त्रासही कमी होतात.

त्वचेच्या समस्यांपासून मिळते मुक्ती

आपण काय खातो- पितो, याचा परिणाम लगेच त्वचेवर दिसून येतो. चांगला , पौष्टिक आहार घेतल्यास, भरपूर पाणी प्यायल्यास त्वचाही ग्लो करते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्वचेच्या समस्या कमी होता. जीवाणूंच्या संक्रमणापासून त्वचेचे रक्षण होते.

वजन कमी करण्यास मदत करते

वजन वाढल्यामुळे जर तुम्ही त्रस्त झाला असाल तर नियमितपणे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे सुरू करावे. तांब्यामध्ये असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. पचनसंबंधीच्या समस्या कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

कर्करोगाशी लढण्यात प्रभावी

तांब्यामध्ये ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात, जे कर्करोग विरोधी लढा देण्यात मदत करतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने फ्री-रॅडिकल्सची वाढ रोखण्यात यश मिळते.

हे सुद्धा वाचा

ॲनिमियाशी लढण्यात प्रभावी ठरते

लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो. जेव्हा आपल्या शरीरात पुरेशा प्रमाणात लाल रक्तपेशी नसतात, तेव्हा हा त्रास होतो. लाल रक्तपेशी (Red Blood Cells) ऑक्सिजन समृद्ध असते, जे आपल्या फुप्फुसातून शोषले जाते. लाल रक्तपेशींमधून ऑक्सिजन शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचतो. शरीरातील प्रत्येक पेशीस पुरेसा ऑक्सिजन मिळणे गरजेचे असते. तो न मिळाल्यास आपल्याला थकल्यासारखे, कमकुवत वाटते आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होऊन ॲनिमियाचा धोका कमी होतो.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें