AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

How to Reduce Belly Fat: आयुर्वेदिक पेयाच्या सेवनाने ‘बेलीफॅट’ वितळून स्टमक होईल ‘फ्लॅट’ ; स्वयंपाक घरातील ‘या’ वस्तूंच्या वापरातून बनवा उपयोगी आयुर्वेदिक पेय!

पोटावरील चरबी Belly Fat अर्थात पोटाचा घेर व चरबीचा थर काहीही करा कमी होण्याचे नाव घेईना. सुटलेल्या पोटाची चरबी कमी करणे मोठे चॅलेंजींग झाले आहे. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी जाणून घ्या, आयुर्वेदिक उपाय.

How to Reduce Belly Fat: आयुर्वेदिक पेयाच्या सेवनाने ‘बेलीफॅट’ वितळून स्टमक होईल ‘फ्लॅट’ ; स्वयंपाक घरातील ‘या’ वस्तूंच्या वापरातून बनवा उपयोगी आयुर्वेदिक पेय!
बेली फॅट Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 04, 2022 | 4:16 PM
Share

तासन्‌तास व्यायामासाठी जर तुमच्याकडे वेळच नसेल तर काही आयुर्वेदिक पेय (Ayurvedic drink) तुमच्या पेाटावरील चरबी चुटकी सरशी कमी करू शकते. अशाच प्रभावी पेया बद्दल आज आपण पाहणार आहोत. आजकाल प्रत्येक व्यक्ती पोटाच्या चरबीच्या समस्येने त्रस्त आहे. परंतु कामाच्या घाईगडबडीत अनेकांना व्यायामासाठी वेळ मिळतच नाही. अशा परिस्थितीत काही विशिष्ट प्रकारचे हर्बल ड्रिंक्स (Herbal drinks) तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकतात. हे हर्बल पेय घरगुती मसाल्यापासून तयार केले जातात. त्यांचे सतत सेवन केल्याने तुम्हाला एका आठवड्यात तुमच्या शरीरावर परिणाम (effects on the body) दिसू लागतो. पोटाची चरबी कमी करण्यासोबतच ते रोगप्रतिकारशक्ती वाढवितात, चयापचय वाढवता आणि वारंवार भूक लागणेही नियंत्रित करतात, त्यामुळे तुमचे वजन वाढण्याची प्रक्रीया नियंत्रणात येते. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी जाणून घ्या, आयुर्वेदिक उपाय.

बडीशेप पाणी

एका विशिष्ट प्रकारे बडीशेप खाल्ल्याने वजन आणि लठ्ठपणा झपाट्याने कमी होतो. यासाठी मेथी-दाणा, जिरे आणि ओवा (अजवाइन) दाणे बडीशेप सोबत रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उकळून घ्या. नंतर हे पाणी गाळून प्या. बडीशेप अपचन आणि गॅसेसची समस्या दूर करते. मुख्य म्हणजे पोटाची चरबी लवकर कमी होण्यास त्यातून मदत होते. बडीशेपचे पाणी प्यायल्याने भूकही कमी लागते, परिणामी खाण्याच्या अनावश्यक सवयी टाळता येतात. जे वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

मध-लिंबूपाणी

वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी जवळपास सर्वच आहारतज्ज्ञ हे पेय पिण्याची शिफारस करतात. याचे कारण म्हणजे लिंबूमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात, दुसरे म्हणजे लिंबूमध्ये पेक्टिन नावाचे आहारातील फायबर देखील असते जे चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला गती देते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्या.

जिरे पाणी

पोटाची चरबी लवकर कमी करण्यासाठी जिरे पाणी देखील खूप प्रभावी आहे. याशिवाय रोग प्रतिकारशक्तीही वाढवते. जिऱ्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म देखील असतात, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे अतिशय फायदेशीर पेय आहे. रिकाम्या पोटी किंवा जेवल्यानंतर जिऱ्याचे पाणी प्या, दोन्ही प्रकारे शरीराला फायदा होतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.