AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे रामबाण उपाय; ‘स्ट्राँग इम्युनिटी पॉवर’ चा संचार अन् शंभर रोग पळतील दूर!

जिऱ्याचे पाणी आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले जाते. जिऱ्यामध्ये असे अनेक पोषक तत्त्व असतात, जे शरीरातील चयापचय वाढवितात. जाणून घ्या, जिऱ्याच्या पाण्याचे सर्व फायदे.

वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे रामबाण उपाय; ‘स्ट्राँग इम्युनिटी पॉवर’ चा संचार अन् शंभर रोग पळतील दूर!
Weight LossImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 03, 2022 | 5:26 PM
Share

आजच्या काळात लठ्ठपणा (obesity) ही एक मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, बीपी, थायरॉईड आदी सर्व समस्या वेळेआधीच माणसाला घेरतात. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्कआऊटसोबतच त्या गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. जे तुमचे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतात. आपल्या किचनमध्ये नेहमी वापरात असलेली वस्तू म्हणजे, जिरे. जिऱ्याच्या पाण्याची (Cumin water) मदत वजन कमी करण्यासाठी होत असते. व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के., व्हिटॅमिन-बी1, 2, 3, व्हिटॅमिन-ई, प्रथिने, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशियम, झिंक, कॉपर, लोह, कार्बोहायड्रेट असे सर्व घटक जिऱ्यामध्ये आढळतात. अशा परिस्थितीत सकाळी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच, पण शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. जिऱ्याचे पाणी आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर (Very beneficial) मानले जाते. जिऱ्यामध्ये असे अनेक पोषक तत्त्व असतात, जे शरीरातील चयापचय वाढवितात.

1) सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय वाढतो. चयापचय जितका जलद होईल तितक्या वेगाने चरबी जाळून त्याचे ऊर्जेत रूपांतर होते आणि शरीरातील चरबी कमी होते. पण सकाळी जिऱ्याचे पाणी प्यायल्यानंतर किमान तासभर काहीही खाऊ नका.

2) पोट साफ होत नसले तरी, जिऱ्याचे पाणी जरूर प्यावे. जिरे पाणी पचनसंस्थेसाठी चांगले मानले जाते. हे शरीर बद्धकोष्ठता, अपचन, आम्लपित्त, गॅस इत्यादी सर्व समस्या दूर करते आणि तुमची पचनक्रिया गतिमान करते. जलद पचन प्रक्रियेमुळे अन्न लवकर पचते आणि शरीराला ऊर्जा मिळते. तसेच व्यक्तीच्या आत चरबी लवकर वाढत नाही.

3) पोटात सूज आली असेल तरीही जिऱ्याचे पाणी खूप फायदेशीर मानले जाते. जिऱ्यामध्ये असे अनेक गुणधर्म असतात, जे शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. याशिवाय जिऱ्याच्या पाण्यात विटामिन-ई मुबलक प्रमाणात आढळते, जे त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. ते तुमची त्वचा घट्ट आणि चमकदार ठेवते. त्यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या पडत नाहीत आणि वृद्धत्वाचा त्रास होत नाही.

4) पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे लोक वारंवार आजारी पडू लागतात. जिऱ्याचे पाणी रोज प्यायल्याने तुमच्या शरीरात अनेक पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो आणि तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. अशा प्रकारे, शरीर स्वतःच सर्व रोगांपासून संरक्षित आहे.

5) लठ्ठपणामुळे हाय बीपीची समस्याही अनेकदा वाढते. पण पोटॅशियम जिऱ्याच्या पाण्यात आढळते. अशा स्थितीत दररोज जिऱ्याचे पाणी प्यायल्याने हाय बीपीच्या रुग्णांना खूप फायदा होतो आणि बीपीची समस्या नियंत्रणात राहते.

6) जिरे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात साधारण एक चमचा जिरे टाका आणि रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी हलके कोमट करून गाळून प्यावे. हे पाणी नियमित प्या आणि त्यानंतर सुमारे तासभर दुसरे काहीही घेऊ नका.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.