मर्द को दर्द नही होता ! हे खरं आहे का ? पुरूष जास्त का रडत नाहीत ? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

| Updated on: Mar 02, 2023 | 10:16 AM

एखादी छोटीशी गोष्ट जरी झाली तरी स्त्रियांच्या डोळ्यांत लगेच अश्रू येतात. पण मोठ्यांत मोठं दु:ख झालं तरी पुरूषांना जास्त रडू येत नाही. असं का ?

मर्द को दर्द नही होता ! हे खरं आहे का ? पुरूष जास्त का रडत नाहीत ? जाणून घ्या वैज्ञानिक कारण
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : पुरुषांच्या कमी रडण्याबद्दल (why men cry less)अनेक म्हणी आहेत. जसं मर्द को दर्द नही होता ! असली मर्द कभीं आसूं नही बहाते ! वगैरे वगैरे… एखादा मुलगा किंवा तरूण चुकून रडायला लागलाच तर त्याला गप्प करण्यासाठी लगेच मुलींसारखं काय रडतोस रे , असं विचारत हिणवलं जातं. पण वैज्ञानिकदृष्ट्या बघायला गेलं तर पुरूष न रडण्यामागे त्यांचे रफ अँड टफ वागणे (rough and tough nature) हे कारण नव्हे तर काही वेगळंच कारण असतं. हॉलंडमध्ये एका संशोधकाने महिला आणि पुरुषांच्या अश्रूंबाबत एक संशोधनही (research on crying) केले आहे. महिला जास्त का (woman cry more) रडतात आणि पुरुषांच्या डोळ्यांतून फार अश्रू का येत नाहीत, ते जाणून घेऊया.

हार्मोन्स ठरतात कारणीभूत

हे सुद्धा वाचा

एखादं दु:ख सहन करण्याची प्रत्येक व्यक्तीची वेगळी पद्धत, वेगळी क्षमता असते. दु:खी झाल्यावर काही लोकं रडून मोकळी होतात, तर काही जण मनातच ते दु:ख लपवून ठेवतात. चेहऱ्यावर दु:खाची एक लकेर दिसू देत नाही. तरीही महिला आणि पुरुष यांची तुलना करायची झाली तर असे मानले जाते की महिलांना पटकन रडू येतं पण पुरूष खूपच कमी वेळा रडताना दिसतात. समाजात याबद्दल अनके मतमतांतरे, विचार आहेत, पण यामागचे कारण हार्मोन्स आहेत, असे वैज्ञानिक मानतात.

या हार्मोनमुळे रडतात महिला

हॉलंडमधील एका प्राध्यापकांनी मनुष्याच्या अश्रूंबाबत एक अभ्यास केला आहे. त्यातून अशी माहिती समोर आली आहे की महिला वर्षभरात 30 ते 64 वेळा रडतात तर पुरूषांच्या डोळ्यात 6 ते 17 वेळा अश्रू येतात. याबाबत सायकॉलॉजिस्च जॉर्जिया रे यांनी सांगितले की यामागे फिजीऑलॉजिकल कारण आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात प्रोलॅक्टिन हे हार्मोन कमी असते. इमोशनल झाल्यावर डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंसाठी हे प्रोलॅक्टिन हार्मोन जबाबदार असते. तर पुरुषांच्या शरीरात अधिक प्रमाणात टेस्टोस्टेरॉन हे हॉर्मोन असते. हे पुरुषांना रडण्यापासून रोखून धरतात. म्हणून सहसा पुरुष रडताना दिसत नाही.

तसेच यामागे एक कल्चरल कारणही आहे. आपल्या समाजात पुरुषांना महिलांपेक्षा जास्त स्ट्रॉंग, मजबूत मानले जाते आणि रडणे हे कमकुवतपणाचे लक्षण मानले जाते. त्यामुळेही बहुसंख्य पुरुष त्यांचे दु:ख मनातच ठेवणे आणि अश्रू न ढाळणे पसंत करतात. म्हणूनच पुरुष फार क्वचितच रडतात.