AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्याविषयी मोठी अपडेट, NRAI ची मोठी घोषणा, सर्वसामान्यांसह हॉटेल चालकांना धडकी

LPG Cylinder Shortage: मध्य-पूर्वेतील ताणतणावात भारतातील घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर पुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. देशातील अनेक भागात एलपीजी सिलेंडरची टंचाई, तुटवड्याने ग्राहकांना हैराण केले आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. त्यात NRAI ने मोठी घोषणा केली आहे.

LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्याविषयी मोठी अपडेट, NRAI ची मोठी घोषणा, सर्वसामान्यांसह हॉटेल चालकांना धडकी
एलपीजी गॅस सिलेंडरImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 12, 2026 | 8:45 AM
Share

Iran Israel US War: इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आणि मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम भारतावर झाला. एलपीजी सिलेंडरच्या पुरवठा विस्कळीत झाला. देशातील अनेक शहरात आणि खेड्यात एलपीजी गॅसची टंचाई झाली. सर्वसामान्यांपासून ते रेस्टॉरंट मालक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्याने हैराण झाले. काही ठिकाणी एलपीजी गॅसच्या काळाबाजाराच्या तक्रारीने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. होर्मुज स्ट्रेट (Strait of Hormuz) बंद झाल्याने LPG पुरवठा थांबला आहे. त्याचा संपूर्ण देशावर परिणाम झाला आहे.

बड्या शहरांमध्ये काय स्थिती?

दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि कोलकाता सारख्या मेट्रो शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटला व्यावसायिक सिलेंडर मिळण्यात मोठी अडचण होत आहे. रेस्टॉरंट असोसिएशननुसार गेल्या काही दिवसांपासून पुरवठा अनियमित होताच आता तो पूर्णपणे बंद झाला आहे. आता चुली पेटवण्याशिवया पर्याय उरला नाही. जर तेही मिळाले नाही तर अनेक पदार्थ तयार करणे बंद करावे लागेल. तसेच हॉटेल उघडण्याच्या वेळेतही बदल करावा लागेल, अशी भूमिका हॉटेल चालकांनी घेतली.

मुंबई हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन्सने (AHRA) कुकिंग गॅसचा पुरवठा न झाल्याने शहरातील 20 टक्क्यांहून अधिक हॉटेल्स बंद झाल्याचे म्हटले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर मुंबईतील अर्ध्याहून अधिक हॉटेल्स लागलीच बंद होतील अशी भीती असोसिएशनने व्यक्त केली आहे. दरम्यान देशातील परिस्थिती पाहता सरकारने तेल उत्पादक कंपन्यांना एलपीजीचे उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे. तर इतर देशाकडून नैसर्गिक वायू खरेदी करण्यावरही भर देण्यात येत आहे.

LPG पुरवठ्यावर महासंकट

एका डीलरने दिलेल्या माहितीआधारे TOI ने एक वृत्त दिले आहे. त्यानुसार, घरगुती 14.2 सिलेंडर देशात उपलब्ध आहेत. पण रविवारपासूनच देशातील व्यावसायिक LPG सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे रोडावला. त्यात मोठी कपात झाली. तर आता व्यावसायिक सिलेंडरची खेप आलीच नाही. त्यामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल चालकांना मोठा फटका बसला आहे. तर काही ठिकाणी हॉटेल चालकांनी काळ्या बाजारातून गॅस खरेदी केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. देशातील काही भागात एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करणारे ट्रक अचानक गायब झाल्याने हे सिलेंडर काळ्या बाजारात विक्री होण्यासाठी हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.

NRAI च्या सूचनेने अनेकांना धडकी

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने (NRAI) रेस्टॉरंट आणि हॉटेल मालकांना आगाऊ सूचना दिली आहे. आता गॅस सिलेंडरवर अवलंबून न राहता पर्यायी इलेक्ट्रिक अथवा सौर ऊर्जावरील पर्यांयाचा वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे अजून अनेक दिवस गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची आशंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे इंडक्शन शेगडी पासून ते इलेक्ट्रिक पर्यायाकडे ग्राहक वळले आहेत.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.