AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन लोटसचा धमाका; 55 वर्षांची सत्ता उलथवली, पंचायत समितीवर पहिल्यांदाच कमळ फुलणार, नेमकं काय घडलं?

सांगोला पंचायत समितीच्या ५५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाजपचा सभापती होणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे ऑपरेशन लोटस यशस्वी झाले आहे.

ऑपरेशन लोटसचा धमाका; 55 वर्षांची सत्ता उलथवली, पंचायत समितीवर पहिल्यांदाच कमळ फुलणार, नेमकं काय घडलं?
Sangola Panchayat Samiti
| Updated on: Mar 12, 2026 | 8:41 AM
Share

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सांगोला पंचायत समितीमध्ये मोठी ऐतिहासिक क्रांती झाली आहे. सांगोल्याच्या राजकारणात गेल्या ५५ वर्षांपासून असलेल्या एकाधिकारशाहीला सुरुंग लावत भाजपने सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अत्यंत चाणाक्षपणे राबवलेले ऑपरेशन लोटस अखेर यशस्वी ठरले आहे. यामुळे माजी आमदार दीपकआबा साळुंखे यांच्या गटाला मोठे खिंडार पडले आहे.

सांगोला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या पूर्वसंध्येला राजकीय हालचालींना वेग आला होता. दीपकआबा साळुंखे गटातील तीन महत्त्वाच्या पंचायत समिती सदस्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केल्याने विरोधकांचे सर्व गणित कोलमडले. या सदस्यांना आपल्याकडे खेचण्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बुधवारी रात्री गोरे यांच्या निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली. ज्यामध्ये सत्तेचे वाटप आणि रणनीती निश्चित करण्यात आली.

भाजपच्या पहिल्या महिला सभापती म्हणून इतिहास रचणार

सांगोला पंचायत समितीच्या स्थापनेपासून आजवर भाजपला कधीही सभापती पदापर्यंत पोहोचता आले नव्हते. मात्र, यावेळेस महायुतीच्या बैठकीत सभापती पदाचा पहिला मान भाजपला देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानुसार जवळा पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या पूनम इंगवले या भाजपच्या पहिल्या महिला सभापती म्हणून इतिहास रचणार आहेत. तर नाझरे गणातून विजय मिळवलेले शिवसेनेचे (शिंदे गट) अजय सरगर यांची उपसभापती म्हणून वर्णी लागली आहे.

भाजपची ताकद वाढणार

सांगोला हा पारंपरिकरित्या शेकाप आणि साळुंखे-देशमुख घराण्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र या ऑपरेशन लोटसमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी साळुंखे गटातील सदस्यांना भाजपच्या गोटात सामील करून घेतल्याने केवळ पंचायत समितीच नाही, तर आगामी जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक निवडणुकांमध्येही भाजपची ताकद वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यातच उद्या (शुक्रवारी) सांगोला पंचायत समितीच्या सभागृहात सभापती आणि उपसभापती निवडीची अधिकृत प्रक्रिया पार पडणार आहे. महायुतीकडे आता स्पष्ट बहुमत असल्याने ही निवड केवळ औपचारिकता उरली आहे. या ऐतिहासिक विजयामुळे सांगोल्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे तालुक्यात जल्लोषाची तयारी सुरू आहे.

Follow Us
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना