AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरुष रडले, तर त्यात काहीही गैर नाही, सचिन तेंडुलकरची पुरुषांसाठी भावूक पोस्ट

'पुरुषाने रडण्यात काहीही गैर नाही', असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सांगितलं. 'जागतिक पुरुष आठवडा' निमित्त सचिनने एक भावूक पोस्ट केली

पुरुष रडले, तर त्यात काहीही गैर नाही, सचिन तेंडुलकरची पुरुषांसाठी भावूक पोस्ट
| Updated on: Nov 20, 2019 | 11:20 PM
Share

मुंबई : ‘पुरुषाने रडण्यात काहीही गैर नाही’, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सांगितलं. ‘जागतिक पुरुष आठवडा’ निमित्त सचिनने एक भावूक पोस्ट केली (Sachin Tendulkar Post For Men). ‘पुरुषांनी त्यांच्या भावना लपवण्याची गरज नाही, कठीण परिस्थितीत भावूक झाले तर अश्रूंना वाट करुन द्या, वाहते अश्रू तुम्हाला आणखी मजबूत बनवतील’, असा संदेश सचिन तेंडुलकरने दिला.

‘जागतिक पुरुष आठवडा’च्या निमित्ताने सचिनने पुरुषांसाठी एक खुलं पत्र लिहिलं. यामध्ये त्याने सर्व तरुण युवकांना आणि पुरुषांना त्यांच्या भावना दर्शवण्याचा सल्ला दिला.

View this post on Instagram

To the Men of Today, and Tomorrow! #shavingstereotypes

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

सचिनचा संदेश

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 16 नोव्हेंबर 2013 ला निवृत्ती घेतली. आज त्याला सहा वर्ष झाली आहेत. त्यानंतर सचिन तेंडुलकरने त्याच्या काही आठवणींना उजाळा देत सर्व पुरुषांसाठी एक संदेशपत्र लिहिलं. ‘पुरुष रडले तर त्यात काहीही गैर नाही, भावना प्रकट केल्याने पुरुषाचा पुरुषार्थ कमी होत नाही, यासाठी हा संदेश आहे’, असं सचिनने त्याच्या या पत्रात म्हटलं.

“तुम्ही लवकरच पती, वडील, भाऊ, मित्र, मार्गदर्शक आणि शिक्षक व्हाल. तुम्हाला इतरांसाठी उदाहरण बनावं लागेल. तुम्हाला मजबूत आणि साहसी बनावं लागेल. पण, तुमच्या आयुष्यात असेही काही क्षण येतील जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, शंका आणि संकटांचा अनुभव होईल. अशी वेळही येईल जेव्हा तुम्ही अयशस्वी व्हाल आणि तुम्हाला रडायची इच्छा होईल. पण, अशावेळी नक्कीच तुम्ही तुमच्या अश्रूंना थांबवाल आणि स्वत:ला मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करत कराल, कारण पुरुष हेच करतात. पुरुषांना हीच शिकवण देण्यात आली आहे की, पुरुष कधीही रडत नाही. रडल्याने व्यक्ती कमकुवत होतो.”

“मी देखील याच पद्धतीने मोठा झालो. पण मी चुकलो. वेदना आणि संघर्षानेच मला इतकं सक्षम बनवलं आहे. मला एक चांगला व्यक्ती बनवलं.”

“मी माझ्या आयुष्यात 16 नोव्हेंबर 2013 ही तारीख कधीही विसरु शकत नाही. माझ्यासाठी त्या दिवशी अखेरच्या वेळी पवेलिअन परतने अत्यंत कठीण होते आणि डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं. माझा कंठ दाटून आला होता आणि अचानक माझ्या डोळ्यातून वाट काढत माझे अश्रू जगासमोर आले आणि आश्चर्याचं म्हणजे त्यानंतर मला शांत वाटलं. मला मी मजबूत असल्याची जाणीव झाली. मला मी पुरुष असल्याची जाणीव झाली.”

“आपले अश्रू दाखवण्यात काहीही गैर नाही. मग का तुमच्यातील ती भावना लपवून ठेवायची जी तुम्हाला आणखी सक्षम बनवते. अश्रू का लपवायचे? आपल्या वेदना आणि असुरक्षा दाखवायला खूप हिम्मत लागते. या रुढीवादी विचारांच्या आणि कल्पनेच्या पुढे जाऊन विचार करण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहित करतो”, असं सचिनने त्याच्या पत्रात लिहिले.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.