तुम्हालाही AC शिवाय झोप लागत नाही ? त्वचेपासून शरीराच्या या अवयवापर्यंत होतात एसीचे दुष्परिणाम

Health Problem Due To Ac : उन्हाळ्यात जर तुम्हाला रात्री AC चालू न करता झोप येत नसेल आणि तुम्ही रात्रभर एसीच्या हवेत झोपत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

तुम्हालाही AC शिवाय झोप लागत नाही  ?  त्वचेपासून शरीराच्या या अवयवापर्यंत होतात एसीचे दुष्परिणाम
| Updated on: May 01, 2023 | 2:28 PM

नवी दिल्ली : उन्हाळ्यात अनेक लोकं एसी (AC) शिवाय राहू शकत नाही. हे असे शस्त्र आहे जे तुम्हाला उष्णतेपासून त्वरित आराम देते. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे चोवीस तास एसीमध्ये राहतात. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की जास्त वेळ एसीमध्ये राहिल्याने तुम्ही खूप आजारी पडू शकता. दिवसभर एसीमध्ये राहिल्याने आरोग्यासोबतच त्वचेवरही (effect on skin and health) परिणाम होतो. या मुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल जाणून घेऊया

एसीमध्ये झोपण्यामुळे होणारे दुष्परिणाम

  1. बरेच लोक रात्रभर एसी लावून 16 अंश सेल्सिअस तापमानात झोपतात. एवढ्या कमी तापमानात झोपल्याने तुम्हाला सर्दी आणि कफचा त्रास होऊ शकतो.
  2. एसी सुरू केल्यानंतर खिडक्या आणि दरवाजे नेहमी बंद ठेवल्याने ताजी हवा खोलीत येऊ शकत नाही. योग्य वायुवीजन नसल्यामुळे तुमचे शरीर थकायला लागते.
  3. एसीमध्ये झोपल्यामुळे तुम्हाला त्वचेची समस्या देखील होऊ शकते. एसी खोलीतील हवेतील आर्द्रता शोषून घेते, ज्यामुळे तुमच्या त्वचेची आर्द्रताही नाहीशी होऊ लागते. जर तुम्ही सतत एसीमध्ये राहिल्यास तुम्हाला कोरडी त्वचा आणि खाज येण्याची समस्या होऊ शकते.
  4. यामध्ये जास्त वेळ झोपल्यामुळे तुम्हाला कंजेशन होऊ शकतो. यामुळे तुम्हाला श्वास घेण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
  5. एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे तुम्ही लठ्ठपणाचाही बळी होऊ शकता. वास्तविक, जेव्हा तुम्ही एसीमध्ये राहता तेव्हा तुमच्या शरीराची ऊर्जा खर्च होत नाही, त्यामुळे चरबी वाढू लागते आणि तुम्ही लठ्ठपणाचे शिकार बनता.
  6. एसीमध्ये बराच वेळ झोपल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता असते. याशिवाय डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो.
  7. एसीमध्ये बराच वेळ झोपल्यामुळे तुमच्या शरीरात दुखण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पाठदुखी, पाय दुखणे, पाठदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागते.
  8. बराच वेळ एसीमध्ये घालवल्याने तुम्ही डिहायड्रेशनचाही बळी होऊ शकता. एसीमध्ये असल्यामुळे तुम्ही पाणी कमी पिता आणि त्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.