सारखं छातीत दुखतंय ! एकटे असताना हार्ट ॲटॅक आला तर काय कराल ? स्वत:चा जीव वाचवण्याचे उपाय माहिती पाहिजेत ना..

| Updated on: Mar 23, 2023 | 7:34 AM

आजकाल कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. विशेषत: जे लोक एकटे राहतात, त्यांना हृदयविकाराचा झटका आला तर त्यांनी प्राण वाचवण्यासाठी काय करावे? जाणून घेऊया..

सारखं छातीत दुखतंय ! एकटे असताना हार्ट ॲटॅक आला तर काय कराल ? स्वत:चा जीव वाचवण्याचे उपाय माहिती पाहिजेत ना..
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : हृदयविकाराचा झटका (heart attack) ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. आता केवळ हृदयरोगी किंवा वृद्ध व्यक्तींनाच हार्ट ॲटॅक येतो, अशी परिस्थिती राहिलेली नाही. आजकाल कोणी जिममध्ये व्यायाम (exercise) करत असेल, शाळेत, ट्रेनमध्ये प्रवास करतानाही माणसाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. सर्वात त्रासदायक गोष्ट अशी आहे की हे कोणत्याही वयोगटातील लोकांना (at any age)होऊ शकते म्हणजे वृद्ध लोक किंवा एखादी तरूण व्यक्ती, अथवा एखाद्यावेळेस मुलांनाही.

आजकाल ज्या प्रकारे कोणालाही हृदयविकाराचा झटका येतो, ते पाहता अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे जर एखादी व्यक्ती असताना त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर अशा वेळी काय करावे? तर अशावेळी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी काय करावे, ते जाणून घेऊया.
दिवसेंदिवस

हार्ट ॲटॅकच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. विशेषत : तरुणांमध्ये आणि त्यातही चाळीशीतील लोकांमध्ये हे खूप आढळत आहे. अशा परिस्थितीत, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ते कसे टाळू शकतो? आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्‍हाला कधीही उपयोगी पडू शकतात.

हे सुद्धा वाचा

हार्ट ॲटॅकची लक्षणे ओळखणे महत्वाचे

तुम्हाला शरीरात कुठेही वेदना किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर एकदा डॉक्टरांना भेट द्या. जर तुम्हाला छातीत जडपणा, घट्टपणा, जळजळ, वेदना यासारख्या समस्या असतील तर ते हृदयविकाराचे कारण असू शकते. जर मळमळ होत असेल आणि हृदयाचे ठोके वाढले असतील तर तुम्ही वेळेत उपचार करून घ्यावेत.

अँब्युलन्स किंवा जवळच्या व्यक्तील फोन करून बोलवावे

जर तुम्ही एकटे रहात असाल आणि तुम्हाला तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारची समस्या जाणवत असेल तर रुग्णवाहिका किंवा एखादा नातेवाईक अथवा एखाद्या जवळच्या मित्राला कॉल करा. तसेच लवकरात लवकर त्यांच्यासोबत डॉक्टरांकडे जा.

जिभेखाली ॲस्पिरीनची गोळी दाबून ठेवा

त्रास जाणवत असेल सॉर्बिट्रेट तर ॲस्पिरीन टॅब्लेट 300 mg किंवा Clopidogrel 300 mg किंवा Atorvastatin 80 mg टॅब्लेट जिभेखाली दाबून ठेवा. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 30 मिनिटांत या गोष्टी केल्या तर लगेच फायदा होतो. ॲस्पिरिन रक्त गोठण्यास प्रतिबंध करते. तसेच, ते धमनी मध्ये आलेला अडथळा प्रतिबंधित करते.

आडवे पडा आणि पायाखाली उशी ठेवा

हृदयविकाराचा झटका आलेला असताना जास्त पॅनिक झाल्यास परिस्थिती आणखीनच बिघडू शकते. रक्तदाब असलेल्या रुग्णाला यावेळी घाम येणे आणि चक्कर येण्याचा त्रास जाणवू शकतो. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा बीपी कमी असेल तेव्हा ॲस्पिरिन घेणे टाळावे. कारण त्यामुळे बीपी आणखी कमी होऊ शकते. म्हणूनच अशा परिस्थितीत रुग्णाने आरामात झोपून पायाखाली उशी दाबणे चांगले. या दरम्यान संथ श्वास घेणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. खिडकी उघडा, पंखा किंवा एसी समोर आरामात झोपा. त्यामुळे हृदयाला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.