
भेंडीचं पाणी खरोखर वजन कमी करण्यास मदत करतं का? आजकाल सोशल मीडियावर ते ‘जादूई पेय’ म्हणून प्रसिद्ध होत आहे. असा दावा केला जात आहे की ते भेंडीचं पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होतं. तर हे एक तथ्य आहे की फक्त व्हायरल ट्रेंड आहे? याबद्दल जाणून घेऊ… या विषयावर आरोग्य तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे आणि हे पाणी पिण्यापूर्वी कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे देखील जाणून घ्या…
आजकाल सोशल मीडियावर काही लोक भेंडीच्या पाण्याचे फायदे सांगत आहेत. भेंडीचं पाणी पिल्यानं वजन कमी होण्यास मदत होते असं म्हटलं जात आहे. काही लोक असं मानतात आणि भेंडीचं पाणी पितात, पण ते खरोखर फायदेशीर आहे का? भेंडीच्या पाण्याचे शरीरासाठी काय फायदे आहेत? वजन कमी करण्याशी त्याचा काही संबंध आहे का? यावर तज्ज्ञांचं मत काय आहे जाणून घ्या.
डॉ. अजित जैन म्हणाले की, भेंडीचं पाणी वजन कमी करण्यास मदत करू शकते. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी ते फायदेशीर आहे. भेंडीचं पाणी पिल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. त्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं, जे पचन मंदावतं आणि एकूण कॅलरीजचं प्रमाण कमी करतं.
डॉ. जैन म्हणाले की, भेंडी खाल्ल्याने किंवा त्याचे पाणी पिल्याने बराच वेळ पोट भरलेलं राहतं, ज्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होते. भेंडीच्या पाण्यात कॅलरीज खूप कमी असतात. भेंडीचं पाणी प्यायल्याने भूक कमी लागते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
डॉ. जैन म्हणाले की, भेंडीचं पाणी वजन कमी करण्यास मदत करते, परंतु ते प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. याचे कारण म्हणजे भेंडीचे पाणी प्रत्येकासाठी योग्य नाही. पोटाच्या समस्या किंवा अपचन असलेल्या लोकांनी भेंडी खाणं किंवा त्याचं पाणी पिणं टाळावं.
युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असलेले आणि किडनी स्टोनची समस्या असलेल्या लोकांनीही कोणत्याही स्वरूपात भेंडीचे सेवन करणं टाळावं. ते साखरेची पातळी नियंत्रित करत असल्याने, रक्तातील साखरेची पातळी कमी असलेल्या लोकांसाठी भेंडीचं पाणी चांगलं नाही. म्हणून, हे सूत्र प्रत्येकासाठी योग्य नाही.
जर तुम्ही याच्या मदतीने वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. भेंडीचं पाणी हे जादूचे पेय नाही; फक्त ते पिल्यानं तुमचं वजन कमी होणार नाही. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम आवश्यक आहेत.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा…)