Health Tips : चाळीशीनंतर देखील दिसाल तरुण, ‘हे’ 5 पदार्थ ठरतील उपयोगी, कायम राहाल निरोगी
Health Tips : चाळीशीनंतर तारुण्य टिकवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. तारुण्य टिकवण्यासाठी फक्त आहारच नाही तर, व्यायामासोबतच, चांगली झोप आणि संतुलित आहार तुम्हाला तरुण दिसण्यास मदत करू शकतात.

Health Tips : वयाच्या 30 व्या वर्षानंतर शारीरात अनेक नैसर्गिक बदल होत असतात. चाळीशीनंतर देखील अनेक बदल शरीरात होत असतात. चाळीशीनंतर, स्नायूंचे आरोग्य , हृदय, मेंदू, हाडे आणि त्वचेच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. कोणतंच सुपरफुड तारुण्य टिकवू शकत नाही. पण अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर, आरोग्यदायी चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी समृद्ध असलेले पदार्थ आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. तर जाणून घ्या कोणते असे पदार्थ आहेत, जे आपलं तारुण्य टिकवू शकतात.
बेरी : स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरीसह बेरीमध्ये फायबर आणि विविध अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचं आहार सामिल करणं आरोग्यासाठी फार चांगलं आहे. ताजी फळं दही किंवा ओट्ससोबत खाल्ली जाऊ शकतात. फळांच्या नावाखाली अतिरिक्त साखर घातलेल्या रसांपेक्षा संपूर्ण फळे खाणे हा एक चांगला पर्याय आहे.
अंडे : चाळिशीनंतर स्नायूंचं आरोग्य टिकवण्यासाठी पुरेसे प्रथिने खाणं महत्त्वाचे आहे. अंडी उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचा स्रोत असून त्यात अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. ती भुर्जी, भाज्यांसोबत ऑम्लेट किंवा इतर संतुलित जेवणाचा भाग म्हणून खाल्ली जाऊ शकतात.
चरबीयुक्त मासे : सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल यांसारख्या चरबीयुक्त माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. यातून हृदय आणि मेंदूच्या आरोग्याशी संबंधित पोषक तत्वे मिळतात. काही माशांमध्ये व्हिटॅमिन डी सुद्धा आढळते. आठवड्यातून एकदा मासे खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं.
हिरव्या भाज्या : पालक आणि मेथीसह विविध हिरव्या पालेभाज्यांमध्ये फोलेट, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि इतर सूक्ष्म पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. आपल्या आहारात नियमितपणे विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा समावेश करणे हे निरोगी आहारासाठी एक उत्तम भर आहे.
पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तारुण्य टिकवण्यासाठी फक्त आहारावर अवलंबून राहू नये. संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, चांगली झोप, तणावाचं व्यवस्थापन आणि धूम्रपान टाळणे तुम्हाला वृद्धत्वापासून दूर ठेवेल. पण जीवनशैलीत कोणतेही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.