AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ

मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध… बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ

| Updated on: Sep 11, 2026 | 10:11 AM
Share

मनोज जरांगे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली अवैध संपत्ती कमावल्याचा आरोप अजय बारस्कर यांनी केला आहे. बारस्करांनी ईडी चौकशीची मागणी केली असून, यावर गंगाधर काळकुटे यांनी कोणत्याही यंत्रणेमार्फत चौकशीस तयार असल्याचे सांगत, आंदोलनात चुकीचे काहीही केले नसल्याचा पलटवार केला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अवैध संपत्ती कमावल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर अजय बारस्कर यांनी केला आहे. बारस्करांनी या प्रकरणाची सखोल चौकशी अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पांडुरंग तारक, किशोर बंलाडे, गंगाधर काळकुटे, श्रीराम कुरणकर, संजय कटारे, स्वप्नील तारक, बद्रीनाथ तारक आणि विलास खेडकर यांच्यासह अनेकांची नावे तक्रारीत दिली आहेत. या आरोपांवर पलटवार करताना, जरांगेचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी, जगातील कोणत्याही यंत्रणेमार्फत चौकशीसाठी आपण तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आंदोलनात गैरप्रकार किंवा चुकीच्या गोष्टी करण्यासाठी आलेलो नसल्याचे त्यांनी सांगितले. काळकुटे यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने आंदोलनात सहभागी झाल्याचे नमूद केले. तसेच, त्यांच्यावर वैयक्तिक आरोप असल्यास त्याचे पुरावे देण्याचे आव्हानही बारस्कर यांना दिले. हे आरोप आणि प्रत्यारोप यामुळे मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात नवीन वाद निर्माण झाला आहे.

Published on: Sep 11, 2026 10:11 AM

Follow Us