AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डीजेला विरोध करणे विद्यानंद बापट यांना पडले महागात, थेट हिंदू सेवा संघानेच..

विद्यानंद बापट यांनी पुण्यात डीजेबंदीची मागणी केली. त्यांच्या या मागणीने राजकारण चांगलेच तापसल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर जोरदार टीका करण्यात आली. विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आली.

डीजेला विरोध करणे विद्यानंद बापट यांना पडले महागात, थेट हिंदू सेवा संघानेच..
Vidyanand Bapat
| Updated on: Sep 11, 2026 | 11:20 AM
Share

पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात विद्यानंद बापट यांचे नावच चर्चेत आहे. गणेशोत्सवात डीजे आणि लाऊडस्पीकरवर बंदीची मागणी त्यांनी केला. काही लोकांनी त्यांच्याविरोधात रोष व्यक्त केला. हेच नाही तर भर मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर त्यांना मारहाण झाली. मात्र, बापट आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. नागपूरमध्ये डीजे बंदी होऊ शकते तर पुण्यात का नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुण्यात डीजे बंदीची मागणी केली जात आहे. लोक रस्त्यावर उतरले. काही राजकीय नेत्यांनीही यावर भूमिका मांडली. बापट यांच्या या लढ्याला अनेकांनी पाठिंबा दिला असला तरी काहींनी निषेधही व्यक्त केला आहे. त्यातच आता हिंदू सेवा संघाने अत्यंत मोठी मागणी केली. थेट विद्यानंद बापट यांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी घालण्यात यावी, अशी मागणीच करण्यात आली.

बुद्धीची देवता गणपती बाप्पा व सांस्कृतिक शहर पुण्याची ओळख असलेल्या गणेशोत्सवाबाबत व इतर सण उत्सवाबद्दल व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सातत्याने आक्षेपार्ह विधान करून चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी घालण्यात यावी तसेच त्यांना पुणे शहरातून हद्दपार करण्यात यावे, अशी आमची मागणी हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष रोहित मारणे यांनी केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील ॲड. प्रदीप नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली श्रद्धेचा अवमान केल्याप्रकरणी विद्यानंद बापट यांनी पुढील 48 तासात हिंदू भाविकांची तसेच गणेशमंडळांची, गणेश भक्तांची, व पुण्यातील वारकरी संप्रदायाची बिनशर्त माफी मागावी, ही आमची पण मागणी आहेच. पण बापट यांच्या वक्तव्यांमुळे समाजात दोन गट निर्माण झाले आहेत.

गणेशमंडळामध्ये व गणेशभक्तांमध्ये, बापट यांच्या विषयी तीव्र नाराजी व रोष असल्याने त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेशोत्सव आनंदात व शांततेत पार पडावा तसेच पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने विद्यानंद बापट यांना दिनांक 11 सप्टेंबर 2026 ते 26 सप्टेंबर 2026 पर्यंत पुणे शहरातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी हिंदू सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Follow Us
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!