उद्योजक राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती, स्वतःच दिली 6 लाखांमध्ये हल्ल्याची सुपारी?
काही दिवसांपूर्वी बारामती विमानतळ परिसरात उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी बारामती विमानतळ परिसरात उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे राणा सूर्यवंशी यांनी स्वत:च हा हल्ला आपल्यावर घडवून आणल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राणा सूर्यवंशी यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी सहा लाखांची सुपारी दिली होती, अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. या घटनेनं आता मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं कारण काय?
काही दिवसांपूर्वी बारामती विमानतळ परिसरात उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या हल्ल्यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत देखील झाली होती. दरम्यान त्यानंतर त्यांना पोलिसांनी पुणे येतील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. दरम्यान या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. उद्योजक राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती, समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राणा सूर्यवंशी यांनी स्वत:च आपल्या हल्ल्याची सुपारी दिली होती. सहा लाख रुपयांमध्ये ही सुपारी दिल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राणा सूर्यवंशी यांनी स्वत:वर हल्ला करण्यासाठी सहा लाखांची सुपारी दिली होती. व्हिआयपी सुरक्षेसाठी राणा सूर्यवंशी यांनी स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा बनाव रचला. हल्ला करण्यापूर्वीच हल्लेखोरांना काही रक्कम देण्यात आली होती, अशी माहिती आता सूत्रांकडून समोर आली आहे. या प्रकरणात निनाद महाडिक आणि ज्ञानेश्वर साळुंखे अशा दोन व्यक्तींना अटक करण्यात आलं आहे. त्यांच्याकडूनच आता या हल्ल्याबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या रुग्णालयातून फरार
दरम्यान हल्ला झाल्यानंतर राणा सूर्यवंशी यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथून ते फरार झाले. त्यानंतर लगेच पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला होता. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे.
