AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Low blood pressure : ‘या’ कारणांमुळे येऊ शकते तुम्हाला ‘लो बीपी’ ची समस्या.. जाणून घ्या, त्यापासून संरक्षण कसे करावे!

कमी रक्तदाबाला वैद्यकीयदृष्ट्या हायपोटेन्शन असे म्हणतात. यामध्ये मूर्च्छा येणे, चक्कर येणे, अंधुक दिसणे अशी लक्षणे दिसतात. जाणून घ्या, कमी रक्तदाबाची कारणे काय आहेत आणि ते टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतात.

Low blood pressure : ‘या’ कारणांमुळे येऊ शकते तुम्हाला ‘लो बीपी’ ची समस्या.. जाणून घ्या, त्यापासून संरक्षण कसे करावे!
Low blood pressureImage Credit source: social
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 20, 2022 | 7:07 PM
Share

मुंबई : उच्च रक्तदाब हा चिंतेचा विषय आहे, पण तो कमी असला तरी आरोग्याबाबत सक्रिय असायला हवे. उच्च रक्तदाब (High blood pressure) ही एक गंभीर आजाराची स्थिती आहे. जो आपल्या किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो. बीपीची बहुतेक प्रकरणे अनुवांशिक असतात. परंतु, खराब जीवनशैली आणि चुकीचे खाणे देखील तुम्हाला रुग्ण बनवू शकते. कमी रक्तदाबाला वैद्यकीयदृष्ट्या हायपोटेन्शन (Hypotension) असे म्हणतात. यामध्ये मूर्च्छा येणे, चक्कर येणे, अंधुक दिसणे अशी लक्षणे दिसतात. तज्ञ म्हणतात की, जर तुमची बीपी पातळी नैसर्गिकरित्या कमी असेल तर यापेक्षा चांगले काहीही नाही, परंतु जर आरोग्याशी संबंधित काही समस्यांमुळे पातळी घसरत असेल तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. जाणून घ्या, कमी रक्तदाबाची कारणे (Causes of low blood pressure) काय आहेत आणि ते टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतात.

कमी रक्तदाबामुळे येणाऱया समस्या

1. वाढत्या वयाबरोबर आपले शरीर अनेक रोगांचे घर बनू लागते आणि त्यापैकी एक म्हणजे बीपीची समस्या. असं म्हटलं जातं की, एकदा कुणाला असं झालं की त्याला औषधं घेऊन आयुष्य काढावं लागतं. कमी रक्तदाबाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे खराब जीवनशैली. चुकीच्या गोष्टी खाणे, कधीही अन्न खाणे आणि कधीही झोपणे किंवा उठणे या सवयी वाईट जीवनशैलीचा भाग आहेत. अशा जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या वाढतात आणि व्यक्ती कमी रक्तदाबाचे रुग्ण बनतात.

2. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर यामुळे देखील तुम्ही लो बीपीचे शिकार होऊ शकता. व्यस्ततेमुळे किंवा आळसामुळे लोक कमी पाणी पितात आणि ते लो बीपीसारख्या आजाराचे रुग्ण बनतात.

3. औषधाचा वाईट परिणाम, गंभीर दुखापत, ताणतणाव आणि दीर्घकाळ उपासमार यामुळे तुम्ही कमी रक्तदाबाचे रुग्ण देखील होऊ शकता.

अशा प्रकारे संरक्षण करा

कमी रक्तदाबाची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि औषधोपचार करून घ्या.

जर तुमचे बीपी अचानक कमी होत असेल तर, अशा परिस्थितीत ताबडतोब मिठाच्या पाण्याचे सेवन करा. याशिवाय जेवणातील मीठाची पातळी सामान्य ठेवा.

दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे. यासाठी दररोज किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यावे.

कामामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला ताण येत असेल तर तो कमी करण्यासाठी दररोज ध्यान किंवा योगासने करा. हा व्यायाम केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसून येईल.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान