AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॅनेटरी पॅडला पर्याय असलेले मेन्स्ट्रुअल कप म्हणजे काय? असे आहेत मेन्स्ट्रुअल कपचे फायदे

डिस्पोजेबल पॅड (Disposable Pad) रक्त शोषतात व त्यामध्ये जंतू वाढतात. पॅडला दुर्गंधी येऊ नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या सुगंधी रसायनांमुळे अपाय होण्याची शक्यता असते. तर आज आपण मेन्स्ट्रुअल कपबद्दल जाणून घेणार आहोत.

सॅनेटरी पॅडला पर्याय असलेले मेन्स्ट्रुअल कप म्हणजे काय? असे आहेत मेन्स्ट्रुअल कपचे फायदे
मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचे फायदे Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 20, 2022 | 5:31 PM
Share

सॅनिटरी पॅडबाबतीत (Sanitary Pad) आता मोठ्याप्रमाणात जनजागृती झाली आहे. सॅनिटरी पॅडला उत्तम आणि सोयीस्कर असा एक पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे मेन्स्ट्रुअल कप (menstrual cup). हा कप वापरल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दिवस त्याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नसते. पाळी (Periods) म्हटली की मूड स्विंग्स, पोट फुगणे, ओटीपोटात कळा, कंबरदुखी अशा अनेक समस्येतून महिला जात असतात. त्यातच कपड्यामुळे ओलेपणा, डाग पडण्याची भीती असते.  यामुळे स्त्रीला सतत एक एन्झायटी असते. डिस्पोजेबल पॅड (Disposable Pad) रक्त शोषतात व त्यामध्ये जंतू वाढतात. पॅडला दुर्गंधी येऊ नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या सुगंधी रसायनांमुळे अपाय होण्याची शक्यता असते. तर आज आपण मेन्स्ट्रुअल कपबद्दल जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हालाही तुमच्या मासिक पाळी चांगल्या प्रकारे कसे हाताळायचे हे कळेल.

कसे वापरायचे हे कप?

प्रथम मेन्स्ट्रुअल कप सी-आकारात फोल्ड करावा, नंतर योनीमध्ये घाला.  ते लावताच  योनीच्या बाहेरील थरात घट्ट बसते. म्हणजेच ते  योनी पूर्णपणे सील करेल. ते लावल्यानंतर, आपल्या हाताने हलके फिरवण्याचा प्रयत्न करा. जर ते योग्य प्रकारे बसविल्या गेले असेल तर ते सहजपणे हलते. एकदा लागू केल्यानंतर फ्लो कितीही असला तरी 12 तास बदलण्याची गरज नाही.

मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचे फायदे

सॅनिटरी नॅपकिन्स वारंवार सेट करावे लागतात, परंतु मेन्स्ट्रुअल कपला नाही. मेन्स्ट्रुअल कप रक्त बाहेर येण्यापूर्वी आत शोषतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वास येत नाही. सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पन्समधील रक्त योनीभोवती बराच काळ राहते. पण कपिंग केल्यावर तसे होत नाही. त्यात रक्त जमा होत राहते. ज्यामुळे स्त्रियांना टॉक्सिक शॉक सिंड्रोम कधीच होऊ शकत नाही. TSS हा एक दुर्मिळ जिवाणूजन्य रोग आहे जो ओले नॅपकिन्स आणि टॅम्पन्स दीर्घकाळ वापरल्याने होतो.

योग्य आकाराचा मेन्स्ट्रुअल कप शोधण्यासाठी खालील गोष्टींचा विचार केला पाहिजे

  1. तुमचे वय
  2. तुमच्या गर्भाशय ग्रीवाची (सर्विक्स) लांबी
  3. मासिक पाळीत तुमच्या अंगावर किती जाते?
  4. कपची दृढता आणि लवचिकता
  5. कप क्षमता
  6. तुमच्या पेल्विक फ्लोर स्नायूंची ताकद
  7. तुमची डिलिव्हरी नॉर्मल (योनीमार्फत) झाली आहे का?

(मेन्स्ट्रुअल कप वापरण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...