El Niño चा भारतावर भयंकर परिणाम, मार्च महिन्यात होणार इतके मृत्यू ,पुढील सहा महिने धोक्याचे
'क्लायमेट इम्पॅक्ट लॅब' ने एक नवीन टुल एल निनो हीट मॉर्टेलिटी ट्रॅकर तयार केले आहे, ज्याच्या ताज्या अपडेटने समजते की येत्या सहा महिन्यात कुठे सर्वात जास्त मृ्त्यू होण्याची शक्यता आहे.

सुपर एल निनोमुळे साल २०२ मध्ये जगभरात पावसाचा पॅटर्न बदलत असून तापमान वाढत आहे. याला पाहता आता क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने एक नवीन टुल एल निनो हीट मॉर्टेलिटी ट्रॅकर तयार केले आहे. हे टूल सांगतो की अल निनोच्या उष्णतेने मानवी जातील किती धोका आहे. हा ट्रॅकर दर महिन्याचा डेटा देतो, ज्यात पुढील ६ महिन्यात होणाऱ्या संभाव्य मृत्यूचा अंदाज कळतो.
जून महिन्यापासून एल निनोच्या सुरुवातीनंतर उष्णतेने किती मृत्यू झाले याची माहिती हा ट्रॅकर सांगतो. जगभरातील राज्याचा डेटा उपलब्ध करुन हा टुल फंड देणाऱ्यांना आणि काम करणाऱ्यांना सर्वात प्रभावित क्षेत्राची माहीती देतो. यामुळे हे कळण्यास मदत होते की संसाधनांची सर्वात जास्त गरज कुठे आहे आणि कुठे लोकांचे प्राण वाचवता येऊ शकतात.
एकूण किती लोकांचे प्राण जाऊ शकतात
आता या ट्रॅकरमध्ये मार्चपर्यंतच्या डेटाचा समावेश केला आहे. यानुसार एल निनोमुळे वाढणाऱ्या तापमानामुळे एकूण ८,५७,००० मृत्यू होऊ शकतात. ज्यात ३,७३,००० मृत्यू येत्या सहा महिन्यात होण्याचा अंदाज आहे. क्लायमेट इम्पॅक्ट लॅबचे सह-संस्थापक आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोत अर्थशास्रच्या मिल्टन फ्रिडमॅन डिस्टिंग्विश्ड सर्व्हीस प्रोफेसर मायकल ग्रीनस्टोन यांनी सांगितले की आमचा शोध नवीन पूर्वानुमान क्षमतांचा वापर करुन एक खूप अत्यावश्यक प्रश्नाचे उत्तर देतो की भीषण उष्णतेने लोकांचे मृत्यू कुठे होतील ?
त्यांनी सांगितले की भीषण तापमानाच्या परिणामांचा आधीच अंदाज लावता येणे मोठे पाऊल आहे. याचा अर्थ आम्ही हे ओळखू शकतो की कुठे लोकांना सर्वात जास्त धोका आहे आणि लोकांचे प्राण जाण्याआधीच पावले उचलता येतील. ते म्हणाले की हा ट्रॅकर त्या सुपर एल निनो संदर्भात माहिती देतो, ज्याचा सामना आज आपण करत आहोत.
सर्वाधिक मृत्यू कुठे ?
त्यांनी सांगितले की एल निनोमुळे उष्णतेमुळे सर्वात जास्त होणारे मृत्यू विकसनशिल देतात होतील. येत्या सहा महिन्यात ( ऑक्टोबर- मार्च ) च्या डेटाच्यानुसार अंदाज आहे की एल निनोच्या उष्णतेने नायजेरियात सर्वात जास्त मृत्यू होण्याचा अंदाज आहे. या सहा महिन्यांच्या दरम्यान तेथे सुमारे ५६,००० लोकांचे मृ्त्यू होऊ शकतात. यानंतर भारताचा क्रमांक लागतो, भारतात सुमारे ५५,००० मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्यातील बहुतांश मृत्यू मार्च महिन्यात होण्याचा अंदाज आहे.
दक्षिण-पूर्व आशिया एक मोठा हॉटस्पॉट बनलेला आहे. इंडोनेशियात एल निनोच्या उष्णतेने सुमारे २९ हजार लोकांचे मृत्यू होण्याचा अंदाज आहे. तर ब्राझीलमध्येही दर महिन्याला उष्णतेने होणारे मृत्यू सरासरी पेक्षा जास्त असतील. लॅब एल निनो संपेपर्यंत दर महिन्याला अपडेट करणार आहे, ज्यामुळे हे सतत कळेल की उष्णतेने होणाऱ्या मृ्त्यूची जोखीम कशी वाढत आहे.
