मोठी बातमी! विधानपरिषदेमध्ये महायुतीचा पराभव होताच शिंदेंचा भाजपला पहिला धक्का, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग
राज्यात पाच विधान परिषद जांगासाठी नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ यश मिळालं, तर महायुतीला पराभवाचा धक्का बसला, त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. राज्यात तीन पदवीधर आणि दोन शिक्षक अशा पाच विधान परिषदेच्या मतदारसंघांची निवडणूक पार पडली. यामध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ अशाच पाच जागांचा समावेश होता. मात्र या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत महायुतीचे दोनच उमेदवार विजयी झाले, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र तीन जागांवर विजय मिळवला. ज्यामध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ आणि पुणे पदवीधर मतदारसंघ यांचा समावेश आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघात आणि अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीचा विजय झाला.
दरम्यान या निवडणुकीमध्ये अपयश येताच आता महायुतीमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. भाजप आणि शिवसेना आमने-सामने आल्याची पहायला मिळत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात झालेल्या महायुतीच्या पराभवानंतर भाजपने शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केसाने गळा कापल्याची टीका भाजपचे प्रवक्ते नवनात बन यांनी केली आहे. तर दुसरीकडे नेतृत्वातच बदल करा, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा अशी थेट मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
दरम्यान एकीकडे या सर्व गोष्टी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भाजपमधील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.
विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. भाजपकडून शिवसेना शिंदे गटावर परभवाचं खापर फोडण्यात येत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार हर्षदा देशमुख या विजयी झाल्या, यावरून भाजपने रवींद्र धंगेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
