Pradeep Purnekar Case Thane : ठाण्यात हायहोल्टेज ड्रामा, शिंदे-ठाकरे गट आमने सामने
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आले असून, टेंभी नाक्यावर शक्तिप्रदर्शन सुरू आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर कोणती भूमिका मांडली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येप्रकरणानंतर ठाण्यातलं राजकीय वातावरणही प्रचंड ढवळून निघालं आहे. शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असे दोन्ही गट आता आमनेसामने आले आहेत. त्यामुळे आता पुढे मोठा राडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणावरुन शिंदेसेने विरुद्ध ठाकरे आणि मनसे असेही चित्र निर्माण झालेले दिसत आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे टेंभी नाक्यावर शक्तिप्रदर्शन पाहायला मिळतंय तर आदित्य ठाकरे हे ठाण्याला रवाना झाले आहेत. आज आदित्य ठाकरे हे पू्र्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
ठाण्यामध्ये बराचश्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आज काही वेळापूर्वी माजी खासदार राजन विचारे यांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडलीय. आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार, असा थेट इशारा त्यांनी पोलिसाना दिला आहे. दोन्ही सेनेचे कार्यककर्ते आज ठाण्यात पसरलेले दिसत आहेत. टेंभीनाक्यावर दोन्ही सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले दिसले आहेत.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, खारघर आसपासच्या सगळ्या जिल्ह्यांतून हे सेनेचे कार्यकर्ते दाखल होत आहेत. दोन्ही सेनेचे आमदार, विभागप्रमुख, नगरसेवक हेही यावेळी आपलं शक्तिप्रदर्शन दाखवत आहेत. प्रदीप पूर्णेकर प्रकरणामध्ये मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने केलेला आहे. त्यामुळे त्यांना अटक करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे.
ठाण्यामध्ये गंगाजलसारखी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधवांनी केली आहे. पूर्णेकर कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका मनसेनेही मांडली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे पूर्णकर कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत त्यानंतर ते काय भूमिका मांडतात याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, यावेळी मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाणे जिल्हा महिला प्रमुख पदाचा राजीनामा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला आहे. माझ्यावर होत असलेल्या आरोप हे दुर्दैवी आहेत. त्यामुळे पक्षालाही त्रास होत आहे. त्यामुळे हा राजीनामा सोपवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
