Miscarriage: वारंवार गर्भपात होण्यामागणी नेमकी कारण काय? जाणून घ्या आणि संभाव्य धोका आताच टाळा

गर्भधारणेचे पहिले 20 आठवडे गुंतागुंतीचे असतात. या काळात गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या काळात तुम्ही विशेष काळजी घ्यावी.  अशा अवस्थेत जड वस्तू उचलू नये. तसेच जास्त काम करु नये. आणि हालचाल करणे देखील थांबवू नये.

Miscarriage: वारंवार गर्भपात होण्यामागणी नेमकी कारण काय? जाणून घ्या आणि संभाव्य धोका आताच टाळा
गर्भपात Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 10:29 AM

हवामानात झालेला बदल आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे (Miscarriage) दिवसेंदिवस गर्भपात होण्याचे प्रमाण वाढले आहे. जर तुम्हालाही वारंवार गर्भपात झाल्यामुळे आई होण्यास त्रास होत असेल तर यामागे अनेक कारणे (Reason Of Miscarriage) असू शकतात. त्यामुळे गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरत आहे. तसेच डॉक्टर सांगतिल त्या आवश्यक तपासण्या देखील करून घ्याव्यात. वारंवार गर्भपात झाल्यामुळे महिलांना तणाव जाणवू लागतो. परंतु, गर्भधारणेदरम्यान तणाव हे देखील गर्भपाताचे कारण असू शकते. वारंवार गर्भपात होणे ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे हा गर्भपात का होतो याची कारणे आपण जाणून घेणार आहोत.

लैंगिक संक्रमित रोग

लैंगिक संक्रमित आजारामुळे वारंवार गर्भपात होण्याचा धोका वाढतो. जर एखादी स्त्री लैंगिक संक्रमित आजाराने ग्रस्त असेल तर तिच्यामध्ये क्लॅमिडीया आणि पॉलीसिस्टिक असे दोन दोष असू शकतात. जर तुमचा पहिल्यांदा गर्भपात झाला असेल. तर दुसऱ्यांदा गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक चाचण्या करा.

अधिक वय असणे

सध्याची पिढी ही करीअर करण्याच्या स्पर्धेत धावत आहे. अनेकांना आपले आधी करीअर करायचे आहे आणि त्यानंतर उरलेला वेळ हा इतर गोष्टींना द्यायचा आहे. मात्र, या तुमच्या करीअरच्या नादात तुमचे वय वाढत आहे. हे विसरुन चालणार नाही. जर तुमचे वय जास्त असेल तर वारंवार गर्भपात होण्याची समस्या असू शकते. कारण वृद्धत्वानंतर शरीरात अनेक शारीरिक समस्या वाढतात. ज्याचा परिणाम गर्भाच्या आरोग्यावर होतो. त्याच वेळी काही स्त्रियांमध्ये गुणसूत्रांची लक्षणे दिसतात. गुणसूत्रांच्या कमतरतेमुळे, गर्भाचा पूर्ण विकास होत नाही आणि या कारणामुळे, वारंवार गर्भपात होतो.

हे सुद्धा वाचा

फायब्रॉइड्स

गर्भाशयातील फायब्रॉइड्स, म्हणजे गुठळ्या होणे. यामुळे वारंवार गर्भपात होऊ शकतो. त्याची लक्षणे वेळीच आढळून आल्यास उपचार शक्य आहेत. लॅपरोस्कोपिक आणि हिस्टेरोस्कोपिक शस्त्रक्रियेच्या मदतीने उपचार केले जातात. गर्भाशयात संसर्ग झाल्यास वारंवार गर्भपात देखील होऊ शकतो. निरोगी गर्भधारणेसाठी तुम्ही प्रसूतीपूर्व तपासणीचा आग्रह धरला पाहिजे.

हार्मोनल बदल

स्त्रियांमध्ये हार्मोनल बदल हे देखील वारंवार गर्भपात होण्याचे कारण असू शकते. ज्या महिलांना थायरॉईड, मधुमेह, लठ्ठपणा किंवा इतर आजार आहेत त्यांना हार्मोन्सशी संबंधित समस्या होण्याची शक्यता जास्त असते. गर्भधारणेदरम्यान अत्यधिक किंवा असामान्य हार्मोनल बदल टाळण्यासाठी, आपण निरोगी आहार, व्यायाम आणि ध्यान यांचा अवलंब केला पाहिजे.

लठ्ठपणा

जास्त वजनामुळे देखील गर्भपात  होऊ शकतो. ज्या महिलांना मधुमेह किंवा थायरॉईडची समस्या आहे त्यांचा गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला थायरॉईड असेल आणि तुम्ही गर्भवती असाल तर वेळेवर औषधे घ्या. रक्तातील साखरेची पातळी तपासत राहा आणि सकस आहारावर लक्ष केंद्रित करा. कारण लठ्ठपणा हे देखील एक मुख्य कारण असू शकते. सोनोग्राफीच्या मदतीने गर्भपात झाल्याचे आढळून येते. त्याच्या मदतीने गर्भधारणा जिवंत आहे की नाही हे ओळखले जाते. गर्भधारणेचे पहिले 20 आठवडे गुंतागुंतीचे असतात. या काळात गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या काळात तुम्ही विशेष काळजी घ्यावी.  अशा अवस्थेत जड वस्तू उचलू नये. तसेच जास्त काम करु नये. आणि हालचाल करणे देखील थांबवू नये.

(वरील माहिती सर्वसामान्य माहितीच्या हेतूने देण्यात आलेली आहे. वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा)

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.