AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monkeypox : मंकीपॉक्समुळे 3 संक्रमितांचा मृत्यू! WHO ने सर्व देशांना दिला सतर्क राहण्याचा इशारा

कोरोना पाठोपाठ ‘मंकीपॉक्स’ विषाणूचेही संक्रमण जगभरात पसरत आहे. या आजाराची भिषणता कोरोनाप्रमाणे नसली तरी, सर्व देशांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. असा सल्ला ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ (WHO) ने दिला आहे.

Monkeypox : मंकीपॉक्समुळे 3 संक्रमितांचा मृत्यू! WHO ने सर्व देशांना दिला सतर्क राहण्याचा इशारा
मंकीपॉक्स समलैंगिक संबंधातून होतो का?
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 8:56 PM
Share

जगात मंकीपॉक्स विषाणूचे ( monkeypox virus) रुग्ण सातत्याने वाढत आहेत. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ (WHO) नुसार, आतापर्यंत 71 देशांमध्ये या विषाणूची 7 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे युरोपमध्ये आढळून आली आहेत. ‘डब्ल्यूएचओ’च्या आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत ‘मंकीपॉक्स’ या व्हायरसमुळे तीन संक्रमितांचा मृत्यू (Death of infected) झाला आहे. जागतिक आरोग्य नेटवर्कने देखील मंकीपॉक्सला साथीचा रोग घोषित (Outbreak declared) केले आहे. दरम्यान, WHO ने अद्याप याला महामारी म्हणून घोषित केलेले नाही. यासंदर्भात ही संघटना 18 जुलैपर्यंत निर्णय घेऊ शकते. यावेळी मंकीपॉक्सच्या लक्षणांमध्येही काही बदल दिसून येत आहेत. त्याचा संक्रमणाचा काळ पाच ते 21 दिवसांचा असतो. यादरम्यान अंगावर पुरळ येण्याबरोबरच ताप, डोकेदुखीचा त्रासही दिसून येत आहे. कोरोना प्रमाणे मंकीपॉक्स आजाराची भिती नसली तरी, सर्व देशांनी सतर्क राहण्याचा इशारा डब्लूएचओने दिला आहे.

समलिंगी पुरुषांना अधिक लागण

या विषाणूची लागण झालेले बहुतांश समलिंगी पुरुष आहेत. विषाणूच्या लक्षणांमध्ये होणारा बदल आणि झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे जागतिक आरोग्य संघटना मंकीपॉक्सला साथीचा रोग घोषित करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतात अद्याप त्याचा प्रादुर्भाव झालेला नाही, पण हा विषाणू धोकादायक ठरू शकतो. दरम्यान, ही दिलासा देणारी बाब आहे की मंकीपॉक्स विषाणूवरही स्मॉलक पॉक्स व्हायरसची लस खूप प्रभावी आहे. चांगली गोष्ट म्हणजे वयोवृद्ध लोकांना स्मॉल पॉक्सविरूद्ध लसीकरण केले जाते. त्यामुळे त्यांना मंकीपॉक्सचा धोका नाही.

कोरोनासारखा धोका राहणार नाही

एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. अंशुमन कुमार म्हणतात की, मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होत असला तरी तो कोरोना व्हायरस (कोविड 19) इतका धोकादायक नाही. कारण त्यात कोरोनासारखे उत्परिवर्तन होत नाही किंवा तो श्वासाद्वारे पसरतही नाही. स्मॉल पॉक्स लस देखील मंकीपॉक्सवर परिणाम करते. अशा परिस्थितीत या विषाणूचा कोणताही धोका नाही.अजूनही कोविडची प्रकरणे जितकी वाढली होती तितकी मंकीपॉक्सची प्रकरणे नाहीत. मात्र, त्याची व्याप्ती सातत्याने विस्तारत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना या विषाणूबाबत सावध आहे.

अशी काळजी घ्या

घर स्वच्छ ठेवा मंकीपॉक्सग्रस्त देशांतून येणाऱ्या कोणाच्याही संपर्कात येणे टाळा फ्लूची लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधा मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या

ही आहेत मंकीपॉक्सची लक्षणे

ताप

स्नायू दुखणे

शरीरावर पुरळ

थकवा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.