Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ, मात्र सक्रिय रुग्णसंख्या 149 दिवसांतील निचांकी

| Updated on: Aug 19, 2021 | 10:03 AM

गेल्या 24 तासात भारतात 36 हजार 401 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 530 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 39 हजार 157 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ, मात्र सक्रिय रुग्णसंख्या 149 दिवसांतील निचांकी
CORONA
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास एक हजाराने वाढ झाली. कालच्या दिवसात 36 हजार 401 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 530 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या सध्या चार लाखांच्या खाली (149 दिवसांतील निचांकी) आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 36 हजार 401 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 530 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 39 हजार 157 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 23 लाख 22 हजार 258 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 15 लाख 25 हजार 80 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 33 हजार 49 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 64 हजार 129 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 56 कोटी 64 लाख 88 हजार 433 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 36,401

देशात 24 तासात डिस्चार्ज – 39,157

देशात 24 तासात मृत्यू – 530

एकूण रूग्ण – 3,23,22,258

एकूण डिस्चार्ज – 3,15,25,080

एकूण मृत्यू – 4,33,049

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,64,129

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 56,64,88,433

गेल्या 24 तासातील लसीकरण – 56,36,336

संबंधित बातम्या :

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच, आतापर्यंत 5 कोटी डोस दिले

सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?