सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?

आम्ही महिन्याला केवळ दहा कोटी लसींचं उत्पादन करू शकतो. जगात कोणतीही एक कंपनी एवढ्या मोठ्या संख्येने लसीचं उत्पादन करू शकत नाही. (Cyrus Poonawala)

सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?
Cyrus Poonawalla
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 3:50 PM

पुणे: आम्ही महिन्याला केवळ दहा कोटी लसींचं उत्पादन करू शकतो. जगात कोणतीही एक कंपनी एवढ्या मोठ्या संख्येने लसीचं उत्पादन करू शकत नाही. त्यामुळे लस देण्याबाबतच्या आकड्याबाबत राजकारणी थापा मारत आहेत, असं सांगतानाच मिक्स डोस देण्यास माझा विरोध आहे, असं सीरमचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी आज स्पष्ट केलं. (corona vaccine: politicians are liars, says Cyrus Poonawalla)

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सायरस पुनावाला यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यावेळी त्यांनी परखड आणि स्फोटक मते व्यक्त केली. राजकारणी थापा मारत आहेत. आम्ही महिन्याला 10 कोटी लसींचं उत्पादन करतो. महिन्याला एवढं मोठं उत्पादन करणं सोपं नाही. जगात कोणतीही एक कंपनी 10 ते 12 कोटी लसींचं उत्पादन देऊ शकत नाही. पण आम्ही अॅडव्हान्समध्ये प्रयत्न करून आणि हजारो कोटींची गुंतवणूक करून हे केलं आहे. म्हणून 110 किंवा 120 पर्यंत आम्ही दरवर्षी लसी देऊ. त्या प्रमाणे तुम्हाला कॅलक्यूलेट करावं लागेल. तसेच बाकीचे उत्पादक महिन्याला एक किंवा दोन कोटी लसी देतील. तर त्याप्रमाणे इम्यूनायझेशन वाढेल. यावरून राजकारणी किती लोकांना व्हॅक्सिन देऊ शकतात आणि किती थापा मारतात याचा विचार तुम्हीच करा, असं पुनावाला म्हणाले.

लॉकडाऊन नकोच, निष्काळीजपणामुळे लोक दगावले

यावेळी त्यांनी लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं. लॉकडाऊन नसावा. एकदाच किड जाईल आणि लोकांना हर्ड इम्युनिटी मिळेल. खूप लोकं मरत असतील तर लॉकाडाऊन उत्तम आहे. पण लो रेट असताना 50 ते 60 टक्के लोक मेले ते निष्काळजीपणाने मेले. कोणी दवाखान्यात वेळेवर गेले नाहीत, कुणाकडे उपचारासाठी पैसे नव्हते तर काही लोक देवाच्या भरवश्यावर राहिले. विविध कम्युनिटीच्या लोकांनी तर सुरुवातीला उपचार नाकारले आणि व्हॅक्सिनही नाकारली. पण आजाराचा प्रकोप वाढल्यानंतर ते रुग्णालयात आले. त्यामुळे उशिर झाला होता. दवाखान्यात तात्काळ येऊन उपचार घेतला तर मृत्यूचं प्रमाणही कमी होतं, असं त्यांनी सांगितलं.

लोकांच्या दु:खातून पैसा कमवायचा नाही

राज्यातील मृत्यूचं प्रमाण कमी झालं आणि व्हॅक्सिनची मागणी कमी झाली तर मला काही फरक पडणार नाही. मला लोकांच्या दु:खातून पैसा जमवायचा नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

कॉकटेल लस नकोच

यावेळी त्यांनी कॉकटेल लस देण्यास विरोध केला. मी कॉकटेल लसच्या विरोधात आहे. मिक्सिंगची गरज नाही. अशा लसीचा परिणाम चांगला निघाला नाही तर एकमेकांवर दोषारोप होईल. सीरम म्हणेल त्यांची लस चांगली नाही. तर समोरची कंपनी म्हणेल सीरमच्या लसीमुळे गडबड झाली. त्यामुळे एकमेकांवर आरोप होण्यापलिकडे दुसरं काही होणार नाही, असं ते म्हणाले.

इतर लसींचं उत्पादन कमी झालं

वर्षे अखेरीपर्यंत भारताचं व्हॅक्सिनेशन पूर्ण होईल का? आणि 45 कोटी डोस येतील का तुम्हाला काय वाटतं? असा सवाल पुनावाला यांना करण्यात आला. त्यावर, सर्वांची अपेक्षा आहे आपल्याला लस मिळायला हवी. पण ते वाटतं तितकं सोपं नाही. आमच्या 20 लसींचं महिन्याचं उत्पादन 10 कोटी होतं. पण आता आम्ही या एका लसीचं 10 कोटी उत्पादन करतो. त्यामुळे बाकीच्या लसींचं उत्पादन थोडं मागे पडलं आहे, असं ते म्हणाले.

तरीही मी सीरम सुरू केली

विविध देश शाळा सुरू करत आहेत. त्याचा काय परिणाम आहे. ते पाहून आपण पुढे गेलं पाहिजे. एक दोन वर्षे शाळा नाही सुरू झाल्या तरी आपण घरीच अभ्यास करू शकतो. मी कधी कॉलेजमध्ये जात नव्हतो. पवार साहेब मला हसायचे. हा कँटिनमध्येच भेटलं हे त्यांना माहीत असायचं. मी वर्गात जात नव्हतो. तरीही मी सीरम इन्स्टिट्यूट बांधली. हवं तर विचारा शरद पवारांना, असं ते म्हणताच एकच खसखस पिकली. (corona vaccine: politicians are liars, says Cyrus Poonawalla)

संबंधित बातम्या:

सीरमचे पुनावाला मोदी सरकारवर संतप्त, पुण्यासाठी लिहिलेल्या पत्राला उत्तर नसल्याचा दावा, वाचा नेमकं काय घडलं?

भाजपचं मिशन ‘जन आशीर्वाद’, चार केंद्रीय मंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार; आघाडीला शह देण्याची तयारी?

2024मध्ये शिवसेनेचं काय होणार?, रामदास आठवलेंचं मोठं भाकीत; दिली ‘ही’ ऑफर

(corona vaccine: politicians are liars, says Cyrus Poonawalla)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.