AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीरमचे पुनावाला मोदी सरकारवर संतप्त, पुण्यासाठी लिहिलेल्या पत्राला उत्तर नसल्याचा दावा, वाचा नेमकं काय घडलं?

सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पुण्यात जास्त कोरोना आहे, इथं लस द्या असं केंद्र सरकारला सांगितलं, पत्रही लिहिलं, पण मोदी सरकार त्याचं उत्तरच देत नाही, अशी प्रतिक्रिया सायरस पुनावाला यांनी दिली आहे.

सीरमचे पुनावाला मोदी सरकारवर संतप्त, पुण्यासाठी लिहिलेल्या पत्राला उत्तर नसल्याचा दावा, वाचा नेमकं काय घडलं?
सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: sagar joshi | Updated on: Aug 13, 2021 | 3:30 PM
Share

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी कोरोना लसीचा तुटवडा भासत असल्यामुळे लसीकरण मोहीम अधिक प्रभावी होताना दिसत नाही. अशावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पुण्यात जास्त कोरोना आहे, इथं लस द्या असं केंद्र सरकारला सांगितलं, पत्रही लिहिलं, पण मोदी सरकार त्याचं उत्तरच देत नाही, अशी प्रतिक्रिया सायरस पुनावाला यांनी दिली आहे. सायरस पुनावाला यांच्या या वक्तव्यामुळे लसीकरणावरुन राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं जोरदार राजकारण रंगण्याची चर्चा आहे. (Cyrus Poonawala criticizes PM Narendra Modi over Pune vaccine supply)

पुण्यात सर्वाधिक कोरोना प्रादुर्भाव आहे. त्यामुळे पुण्यात जास्त लस द्या, असं केंद्र सरकारला सांगितलं, एक पत्रही लिहिलं पण मोदी सरकार त्याचं उत्तरंच देत नाही, असं सायरस पुनावाला यांनी म्हटलंय. लॉकडाऊन लावला नाही तर हर्ड इम्युनिटी तयार होते. 6 महिन्यानं लसीचा प्रभाव कमी होतो म्हणून बुस्टर डोसची गरज आहे. कदाचित त्यानंतरही लसीचा डोस घ्यावा लागू शकतो, असं पुनावाला म्हणाले. आम्ही वर्षाला 110 कोटी लस बनवू शकतो, त्यापेक्षा जास्त लस बनवू शकत नाही. इतर कंपन्या किती लस बनवतात हे माहिती नाही. त्यावरुन तुम्ही गणित करा आणि बघा की राजकारणी किती थापा मारत आहेत, असा गंभीर मुद्दाही पुनावाला यांनी उपस्थित केलाय.

मोदी सरकारला लस मिळाली नाही म्हणून 84 दिवसांचं अंतर

नोवोवॅक्स ही लस 12 वर्षापर्यंतच्या मुलांना देता येईल. पण अमेरिकेत काही परवानग्या बाकी आहे. त्यामुळे लगेच लहान मुलांना लस मिळणार नाही, असंही पुनावाला म्हणाले. त्याचबरोबर तिसरी लाट जास्त गंभीर नसेल असा दावाही त्यांनी केलाय. मोदी सरकानं एक्स्पोर्ट बंद केली हे खूप वाईट झालं. मात्र, यावर बोलू नका असं मला मुलानं सांगितलं असल्याचं सायरस पुनावाला म्हणाले. अमेरिकेत आताही अनेकांना लागण होत आहे. कोरोना जाणार नाही. दोन लसींमध्ये दोन महिन्यांचं अंतर योग्य आहे. पण मोदी सरकारला लस मिळाली नाही म्हणून त्यांनी दोन डोसमध्ये 84 दिवसांचं अंतर ठेवण्यास सांगितलं आहे. आम्हाला नफ्यात खूप नुकसान सहन करावं लागलं. सर्वांची अपेक्षा आहे की आम्हाला लस मिळावी पण ते शक्य नाही. मी लस विकून पैसे कमवायला बसलेलो नाही पण लोकांनी लस घ्यावी, असं आवाहनही सायरस पुनावाला यांनी केलंय.

निष्काळजीपणामुळेच जास्त मृत्यू झाल्याचा आरोप

निष्काळजीपणामुळे लोकांचे मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे, असा गंभीर आरोपही सायरस पुनावाला यांनी केलाय. तसंच दोन लसी एकत्र करण्यास आपला विरोध आहे. 6 महिन्यानंतर लसीचा प्रभाव कमी होत आहे. तिसरा डोस किंवा बुस्टर डोस घेतला पाहिजे. तिसरी लाट जास्त गंभीर नसेल, असंही सायरस पुनावाला यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

विनावर्दी कारवाई नको, साध्या वेशात तर नाहीच नाही, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश

हवाई प्रवास आजपासून महागला, सरकारने देशांतर्गत उड्डाणांचे भाडे 13 टक्क्यांनी वाढवले ​

Cyrus Poonawala criticizes PM Narendra Modi over Pune vaccine supply

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?