विनावर्दी कारवाई नको, साध्या वेशात तर नाहीच नाही, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश

यापुढे पोलिसांना कुठलीही कारवाई करताना कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी वर्दीत राहणे बंधनकारक असेल. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी तशा सूचना दिल्या आहेत.

विनावर्दी कारवाई नको, साध्या वेशात तर नाहीच नाही, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 2:36 PM

मुंबई : यापुढे पोलिसांना कुठलीही कारवाई करताना कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी वर्दीत राहणे बंधनकारक असेल. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी तशा सूचना दिल्या आहेत. विनावर्दी लोकांवर कुठलीही कारवाई करू नका, असं पोलीस आयुक्तांनी बजावलं आहे.

इतकंच नाही तर हा निर्णय वाहतूक पोलिसांनाही लागू असेल. वाहतूक पोलिसांनाही विना वर्दी आता गाड्या अडवता येणार नाही.

काही ठिकाणी पोलीस साध्या वेशात कारवाई करताना आढळत आहेत त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या सूचना दिल्या. विनावर्दी कारवाई करतानाचा फायदा तोतया अधिकारी घेऊ शकतात. त्यामुळे वर्दीत राहूनच जी काही असेल ती कारवाई करा, अशा सूचना हेमंत नगराळे यांनी दिल्या.

हेमंत नगराळे यांची मार्च 2021 मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी पोलीस दलाबाबत विविध निर्णय घेतले. परमबीर सिंगांच्या (Param Bir Singh) जागी नियुक्त झालेल्या हेमंत नगराळेंनी आपला पहिला निर्णय  विशेष पथकाच्या पुनर्रचनेचा घेतला होता.   यापुढे मुंबई पोलीस दलात कोणत्याही विभागात विशेष पथक नसेल. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी हा निर्णय घेतला होता.

मुंबई पोलीस दलात पाच विभाग

कायदा आणि सुव्यवस्था क्राईम आर्थिक गुन्हे शाखा प्रशासन ट्राफिक

यापैकी कायदा आणि सुव्यवस्था, क्राईम आणि आर्थिक गुन्हे शाखा या तीन विभागात तपासाच्या अनुषंगाने वेगवेगळी पथक, सेल निर्माण केली जात असतात. मात्र आता असा प्रकार होणार नाहीत. कोणतेही विशेष पथक सुरु न ठेवण्याचा किंवा न बनवण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला आहे.

1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे याआधी पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत होते. तर मार्च 2021 मध्ये परमबीर सिंह यांची उचलबांगडी करुन हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा चार्ज देण्यात आला.

संबंधित बातम्या 

मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची पुनर्रचना, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंचा पहिला निर्णय

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.