AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2024मध्ये शिवसेनेचं काय होणार?, रामदास आठवलेंचं मोठं भाकीत; दिली ‘ही’ ऑफर

रिपब्लिकन नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. 2024मध्ये शिवसेनेचं मोठं नुकसान होणार आहे. (Shiv Sena should reunite with BJP,says ramdas athawale)

2024मध्ये शिवसेनेचं काय होणार?, रामदास आठवलेंचं मोठं भाकीत; दिली 'ही' ऑफर
रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 7:21 AM
Share

अमरावती: रिपब्लिकन नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. 2024मध्ये शिवसेनेचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत युती करावी, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं. (Shiv Sena should reunite with BJP,says ramdas athawale)

रामदास आठवले आज अमरावतीत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेने भाजपसोबत युती करावी असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं. जर शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तोडावी. नाहीतर शिवसेनेचं 2024 मध्ये खूप मोठं नुकसान होईल. या सरकारमध्ये नेहमी भांडण होत असतात. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही, असं आठवले म्हणाले.

सगळे म्हणतात हाय हाय…

यावेळी त्यांनी रिपब्लिकन ऐक्यावरही भाष्य केलं. लोक तर सगळे म्हणतात हाय हाय… लोक तर सगळे म्हणतात हाय हाय… रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच काय? अशी चारोळी करत त्यांनी ऐक्यावर अधिक बोलणं टाळलं. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर घणाघाती टीका केली. वंचितकडून मतं खाण्याचं राजकारण होत आहे. युती केल्याशिवाय कठीण आहे, असं ते म्हणाले.

घटना दुरुस्तीला पाठिंबा

दरम्यान, कालच आठवलेंचा घटना दुरुस्तीला पाठिंबा. आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास जातीला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्याबाबतचे 127 वे संविधान संशोधन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. या विधेयकाला आठवलेंनी पाठिंबा दिला.

राहुल गांधींना निलंबित करा

आठवले यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधीही चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, असे मत आठवले यांनी मांडले. (Shiv Sena should reunite with BJP,says ramdas athawale)

संबंधित बातम्या:

राहुल गांधींना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा; रामदास आठवले आक्रमक

शरद पवार म्हणाले, माझ्या 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी कधीही असं पाहिलं नव्हतं, नेमकं काय घडलंय?

खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोज आणता ही कसली मर्दानगी?; संजय राऊत भडकले

(Shiv Sena should reunite with BJP,says ramdas athawale)

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.