पतंजलीचे खास आयुर्वेदिक औषध, सर्दी-खोकला, डोकेदुखीला करा बाय-बाय

पतंजली संशोधन संस्थेचे आचार्य बालकृष्ण यांच्या मते, डोकेदुखी, पोटदुखी, पोटात गॅस यासारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी पतंजली दिव्य धारा औषध खूप उपयुक्त ठरू शकते. या औषधाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पतंजलीचे खास आयुर्वेदिक औषध, सर्दी-खोकला, डोकेदुखीला करा बाय-बाय
Patanjali Divya Dhara
| Updated on: Jun 20, 2025 | 7:03 PM

पावसाळ्यात सर्दी, खोकला पोटदुखी अशी समस्या वाढतात. तसेच अनेकांना गॅस आणि डोकेदुखीचा त्रास होतो. यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या दिनचर्येवर परिणाम होते. मात्र पतंजली संशोधन संस्थेचे आचार्य बालकृष्ण यांच्या मते, डोकेदुखी, पोटदुखी, पोटात गॅस यासारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी पतंजली दिव्य धारा औषध खूप उपयुक्त ठरू शकते. या औषधाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पतंजली कंपनीने तयार केलेले पतंजली दिव्यधारा हे एक खास आयुर्वेदिक औषध आहे. जे द्रव स्वरूपात येते आणि डोकेदुखी, पोटदुखी, सर्दी आणि खोकला यासारख्या आजारांवर उपचारासाठी वापरले जाते. या औषधात पेपरमिंट, कापूर, भीमसेनी अर्क, ओव्याचा अर्क आहे. पतंजली दिव्यधारा कोणत्या आजारांमध्ये कसे वापरायचे ते जाणून घेऊयात.

डोकेदुखी

सध्याच्या युगात डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. पतंजली दिव्यधारा वापरून डोकेदुखी बरी होऊ शकते. यात असलेले पेपरमिंट आणि कापूर डोकेदुखीपासून लवकर आराम मिळण्यास मदत करतात. या औषधाचे 3-4 थेंब घेऊन हलक्या हातांनी कपाळावर मालिश केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.

दातदुखी

व्यवस्थित ब्रश न केल्याने किंवा कडक पदार्थ खाल्ल्याने दातदुखीचा त्रास होतो. मात्र दातदुखी कधीकधी असह्य होते. अशावेळी पतंजली दिव्यधारा वापरून दातदुखीपासून आराम मिळू शकतो.

सर्दी

तुम्हाला सर्दी किंवा कोणत्याही प्रकारच्या ऍलर्जीमुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल तर पतंजली दिव्यधारा वापरून तुमची समस्या दूर होऊ शकते. अर्धा ते एक लिटर गरम पाण्यात पतंजली दिव्य धाराचे 4-5 थेंब टाका आणि वाफ घ्या, यामुळे आराम मिळेल.

शरीरावर जखम झाल्यास

शरीरावर कुठेही किरकोळ जखम झाल्यास पतंजली दिव्यधारा वापरता येते. याच्या वापरामुळे दुखापतीमुळे होणारी जळजळ आणि वेदना कमी होतात आणि जखम देखील लवकर बरी होते.

दमा

हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांना त्रासाचा सामना करावा लागतो. आचार्य बालकृष्ण यांच्या मते दम्याच्या रुग्णांनी पतंजली दिव्यधाराच्या 3-4 थेंबांचा वास घ्यावा, यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. तसेच रुग्णाच्या छातीवर पतंजली दिव्यधाराने मालिश केल्यासही फायदा होतो.

डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा

पतंजली दिव्य धारा अनेक आजारांमध्ये फायदेशीर ठरते, मात्र ते वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.