भारतीयांना आणखी लस मिळणार, फायजरला लवकरच मंजुरी मिळणार, कंपनीच्या सीईओचा दावा

| Updated on: Jun 22, 2021 | 9:19 PM

अमेरिकन फार्मा कंपनी फायजरनं त्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या भारतातील वापराला मंजुरी लवकरच मिळेल, असं सांगितलं आहे. भारतात फायजरच्या लसीला परवागनी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

भारतीयांना आणखी लस मिळणार, फायजरला लवकरच मंजुरी मिळणार, कंपनीच्या सीईओचा दावा
फायझर कोरोना लस
Follow us on

नवी दिल्ली: अमेरिकन फार्मा कंपनी फायजरनं त्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या भारतातील वापराला मंजुरी लवकरच मिळेल, असं सांगितलं आहे. भारतात फायजरच्या लसीला परवागनी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. फायजर कंपनी आणि भारत सरकारमध्ये लवकरच करार होईल, अशी माहिती कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोरला यांनी दिली आहे. फायजरनं भारतानं त्यांच्या लसीला तातडीनं मंजुरी द्यावी, अशी मागणी केली होती. (Pfizer company CEO Albert Bourla claimed pfizer now in final stages to get approval for COVID19 vaccine in India)

फायजर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची लस भारतात संक्रमित झालेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा वेरियंटवर प्रभावी असल्याचा दावा केला आहे. फायजर लस 12 वर्षांवरील मुलांना देखील देता येईल. फायजर लस एका महिन्याच्या कालावधीसाठी दोन ते आठ अंश सेल्सियस तापमानापर्यंत व्यवस्थित राहते. फायजरनं भारत सरकारकडे स्थानिक कोरोना लसीच्या क्लिनिकल ट्रायल घेण्यातून सूट मागितली होती. भारत सरकारनं सुरुवातीला याला नकार दिला होता मात्र, नंतर फायजरची मागणी मान्य करण्यात आली.

फायजर लहान मुलांवर चाचणी सुरु करणार

फायजर कंपनी येत्या काळात 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर लसीची चाचणी सुरु करणार आहे. पहिल्या टप्प्यात थोड्याच मुलांवर चाचणी केली जाते. लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीचे वेगवेगळे डोस दिले जातील. फायजर अमेरिका , फिनलँड, पोलंड आणि स्पेनमधील 90 ठिकाणांवर 4500 लहान मुलांवर फायजर लसीची चाचणी घेईल.

ट्रायलसाठी नाव नोंदणी सुरु

फायजरच्या कोरोना लसीच्या लहान मुलांवरील चाचणीसाठी 5 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांची नाव नोंदणी येत्या काळात सुरु केली जाणार आहे. लहान मुलांना फायजरच्या लसीचे 10 मायक्रोग्रामचे दोन डोस दिले जातील. पुढील टप्प्यात 6 महिन्यांपेक्षा मोठ्या मुलांवर चाचणी घेतली जाईल.

संबंधित बातम्या:

Nagpur Vaccination | लशीच्या पुरवठ्याअभावी नागपुरात आजही 18 वर्षावरील वयोगटाचं लसीकरण नाही

Corona Vaccination | उद्यापासून 18 वर्षांवरील सर्वांचं सरसकट लसीकरण, राजेश टोपेंची माहिती

Pfizer company CEO Albert Bourla claimed pfizer now in final stages to get approval for COVID19 vaccine in India